पंजाब: 109 तास बोअरवेल मध्ये अडकलेल्या फतेहवीर सिंह याला बाहेर काढल्यानंतर काही वेळातच मृत्यू
फतेहवीर सिंह ( फोटो सौजन्य- IANS )

पंजाब (Punjab) मधील संगरुर (Sangrur) जिल्ह्यातील भगवानपुर गावातील फतेहवीर जवळजवळ 120 फूट खोल असणाऱ्या बोअरवेल सिंह मध्ये अडकला होता. तर गुरुवारी संध्याकाळी 4 वाजताच्या सुमारास 150 फूट खोली आणि 9 इंच असणाऱ्या बोअरवेल मध्ये फतेहवीर तब्बल 109 तास अडकल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. तर रेक्सु ऑपरेशच्या माध्यमातून फतेहवीर याला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरु करण्यात आले. तर सकाळी 5.12 वाजताच्या सुमारास त्याला बोअरवेल मधून सुखरुप बाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्याला उपचारासाठी डॉक्टरांकडे नेण्यात आले. मात्र तेथे उपचारापूर्वी आपला जीव गमावला असल्याचे सांगितले जात आहे.

दोन वर्षाच्या फतेहवीर याला वाचवण्यासाटी राष्ट्रीय आपदा मोचन बलाकडून प्रयत्न सुरु होते. तर 102 फूट असलेल्या बोअरवेल मध्ये तो पडला होता. त्यानंतर तेथे खोदलेल्या टनलच्या सहाय्याने त्याला बाहेर काढण्यात आले परंतु यासाठी बराच अवधी लागला होता. तसेच फतेहवीर याला बोअरवेल मधून बाहेर काढल्यानंतर त्याच्या अंगावर सूज आलेली दिसून आले. त्यामुळे तातडीने त्याला डॉक्टरांकडे उपचारासाठी हलवण्यात आले होते. मात्र त्याचेळी त्याने आपला श्वास सोडला.

(मध्य प्रदेश: नदीत पोहण्यासाठी गेलेल्या मुलाला मगरीने जिवंत गिळले, परिसरात भीतीचे वातावरण)

तर सुखजिदर सिंह यांना फतेहवीर हा त्यांच्या लग्नाच्या सात वर्षानंतर झाला होता. त्याचसोबत फतेहवीर 10 जून रोजी बोअरवेल मध्ये पडला त्यावेळी त्याचा दुसरा वाढदिवस होता. मात्र फतेहवीर याच्या मृत्यूमुळे सर्वत्र शोककळा पसरली आहे.

खोदलेल्या बोअरवेलचे काम गेल्या वर्षापासून सुरु करण्यात आले असून त्याचा वापर करण्यात येत नव्हता. त्यामुळे बोअरवेलच्या तोंडावर कापड टाकून तेथील भाग बंद करण्यात आला होता. मात्र खेळताना फतेहवीर याचा चुकून पाय या बोअरवेलच्या तोंडावर पडल्याने तो खाली पडला. यादरम्यान त्याच्यासोबत असलेल्या आईने त्याला वाचवण्याचे प्रयत्न केले मात्र ते फोल ठरले.