Indian Railways Cancel Train List: रेल्वेने आज 216 गाड्या रद्द केल्या; घरातून बाहेर पडण्यापूर्वी रद्द झालेल्या गाड्यांची यादी पहा
Indian Railways (Photo Credits: I File Image)

Indian Railways Cancel Train List: भारतीय रेल्वे (Indian Railways) च्या मदतीने दररोज लाखो प्रवासी इच्छित स्थळी पोहोचतात. रेल्वे हा प्रत्येक भारतीयाच्या जीवनातील एक महत्त्वाचा भाग आहे. रेल्वे दररोज हजारो गाड्या चालवते. परंतु, काहीवेळा काही कारणांमुळे अनेक गाड्या रद्द (Cancel Train) केल्या जातात. तसेच वळवल्या जातात.

या गाड्या पुन्हा शेड्यूल केली जातात. लोक महिनोनमहिने कुठेही जाण्याचे प्लॅन्स करतात आणि शेवटच्या टप्प्यात ट्रेन रद्द झाल्यावर त्यांना खूप त्रास सहन करावा लागतो. अशा परिस्थितीत, रेल्वे स्थानकावर जाण्यापूर्वी, आपण रद्द केलेल्या गाड्यांची यादी तपासली पाहिजे. त्यामुळे पुन्हा रेल्वे स्टेशनवर जाण्याच्या त्रासातून सुटका होते. (वाचा - LIC Policy: वृद्धापकाळासाठी एलआयसीची नवी योजना, सरल पेन्शन योजनेंतर्गत दरमहा मिळणार 12000 रुपये पेन्शन, जाणून घ्या याविषयी अधिक)

आज म्हणजेच 5 मार्च 2022 रोजी रेल्वेने अनेक गाड्या रद्द केल्या असून त्यांचे वेळापत्रक बदलले आहे. आज, रेल्वेने एकूण 216 गाड्या रद्द केल्या आहेत. तर रेल्वेने 5 गाड्यांचे वेळापत्रक बदलले आहे. त्याचवेळी रेल्वेने 12 गाड्या वळवल्या आहेत. हे लक्षात घेण्यासारखे आहे की रेल्वे दररोज मोठ्या संख्येने गाड्या रद्द करते, वेळापत्रक बदलते आणि वळवते. याची अनेक कारणे असू शकतात. जसे की, पाऊस, वादळ, धुके इत्यादी खराब हवामानामुळे रेल्वेला हा बदल करावा लागतो. त्याच वेळी, ट्रॅकच्या दुरुस्तीमुळे रेल्वेने अनेक गाड्या रद्द केल्या असून काही गाड्यांच्या वेळापत्रकात बदल केला आहे. तसेच काही गाड्या वळवल्या गेल्या आहेत. आज गाड्या रद्द होण्यामागे अनेक वेगवेगळी कारणे आहेत.

दरम्यान, तुम्हीही आज ट्रेनने प्रवास करणार असाल तर लवकरात लवकर रद्द झालेल्या गाड्यांची यादी तपासा. रद्द केलेल्या, वळवलेल्या आणि रीशेड्युल ट्रेनची यादी तपासण्यासाठी तुम्हाला फक्त स्मार्टफोन आणि इंटरनेटची गरज आहे. चला तर मग जाणून घेऊया रद्द झालेल्या ट्रेनची यादी कशी पाहावी.

रद्द झालेल्या गाड्यांची यादी 'अशी' पहा -

  • रद्द केलेल्या गाड्यांची यादी तपासण्यासाठी तुम्ही
  • enquiry.indianrail.gov.in/mntes/ वर क्लिक करू शकता.
  • Exceptional Trains पर्याय दिसेल. या पर्यायावर क्लिक करा.
  • त्यानंतर रद्द केलेल्या ट्रेन, रिशेड्यूल आणि वळवलेल्या ट्रेनच्या यादीवर क्लिक करा.
  • रद्द केलेल्या ट्रेनच्या यादीत ट्रेन क्रमांक आणि नाव दोन्ही तपासा.

जर तुमच्या ट्रेनचे नाव यादीत नसेल तरच घरातून प्रवासासाठी निघा. अशा प्रकारे वरील यादी पाहिल्यानंतर तुमचा स्टेशनवर जाण्यासाठी लागणारा वेळ वाचेल आणि तुम्ही तुमची गाडी ज्यावेळी शेड्यूल करण्यात आलेली आहे, त्यावेळी स्टेशनवर जाल.