Rahul Gandhi (PC - Twitter/ @PTI_News)

BJP Letter To Election Commission: काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. भाजप (BJP) ने राहुल गांधी विरोधात निवडणूक आयोगाला (Election Commission) पत्र लिहिले आहे. या पत्राद्वारे भाजपने काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X ला निलंबित करण्याची मागणी केली आहे. भाजपने राहुल यांच्या विरोधात तक्रार दाखल केली असून त्यांचे X खाते त्वरित प्रभावाने निलंबित करण्याची विनंती केली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून आक्षेपार्ह मजकूर काढून टाकण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

तथापी, पक्षाने निवडणूक आयोगाला राहुल गांधींविरुद्ध फौजदारी तक्रार दाखल करण्याची आणि राजस्थानच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना फौजदारी खटला चालवण्याच्या सूचना जारी करण्याची विनंती केली आहे. (हेही वाचा -Rahul Gandhi यांनी PM Modi यांचा उल्लेख 'पनौती' केल्यावरून निवडणूक आयोगाची नोटीस; 25 नोव्हेंबर पर्यंत उत्तर देण्यास मुदत)

काय आहे नेमकं प्रकरण ?

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींचे नाव न घेता हल्लाबोल केला. राहुल यांनी पंतप्रधानांचे नाव न घेता 'पनौती' म्हटले होते. काँग्रेस खासदाराच्या या वक्तव्याचा भाजपने पलटवार केला असून भाजपने याप्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. राहुल गांधी सामान्य शिष्टाचार विसरले आहेत, असं भाजप नेते रविशंकर प्रसाद यांनी म्हटलं आहे.