Prayagraj: धक्कादायक! फटाक्यांमुळे भाजल्याने भाजप खासदार रीता बहुगुणा जोशी यांच्या 8 वर्षीय नातीचा उपचारादरम्यान मृत्यू
Representational Image | (Photo Credits: PTI)

उत्तरप्रेदशच्या (Uttar Pradesh) प्रयागराज (Prayagraj) येथील भाजपच्या खासदार रीता बहुगुणा जोशी (Rita Bahuguna Joshi) यांच्या 8 वर्षीय नातीचा फटाक्यांमुळे भाजल्याने मृत्यू झाला आहे. या घटनेने प्रयागराज येथे एकच खळबळ उडाली आहे. फटक्यामुळे मृत मुलगी 60 भाजली होती. ज्यामुळे तिला प्रयागराज येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यासाठी घेऊन गेले होते. परंतु, या घटनेत गंभीर झाल्याने तिला दिल्ली येथील एम्सच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपाचारादरम्यान तिचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. उत्तर प्रदेश येथे फटाक्यांना बंदी घालण्यात आली असूनही या घटनेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

रीता बहुगुणा जोशी यांचा मुलगा मयंक जोशी यांची मुलगी दिवाळीच्या दिवशी फटाके फोडत असताना भाजली होती. त्यानंतर तिला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, या घटनेत संबंधित मुलगी 60 भाजल्याने तिला ताबडतोड एअर अॅम्बुलन्समधून दिल्ली येथील एम्स रुग्णालयात घेऊन गेले. मात्र, उपचारादरम्यान मंगळवारी तिचा मृत्यू झाला आहे. मृत मुलीचे शव दिल्लीवरून तिच्या घरी आणण्यात येत आहे. हे देखील वाचा- Chhattisgarh: छत्तीसगडमधील मुंगेलीच्या जिल्हा व सत्र न्यायाधीशांची शासकीय घरात गळफास लावून आत्महत्या

एएनआयचे ट्विट-

उत्तर प्रदेशमध्ये योगी सरकारकडून फटाक्यांवर बंदी घालण्यात आली होती. दिवाळीच्या एक दिवस अगोदरच राज्य सरकारने 30 नोव्हेंबरपर्यंत फटाक्यांच्या विक्री आणि खरेदीवर बंदी घातली होती. वाढत्या वायु प्रदुषणामुळे एनजीटीने फटाके फोडण्यावर बंदी घातली आहे.