Chhattisgarh: छत्तीसगडच्या मुंगेली (Mungeli) येथे तैनात जिल्हा व सत्र न्यायाधीश कांता मार्टिन यांनी शनिवारी रात्री आपल्या शासकीय घरात साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली. 55 वर्षीय मार्टिन एकट्याच राहत होत्या. दीड वर्षापूर्वीच तिच्या नवऱ्याचा मृत्यू झाला होता. रविवारी पहाटेपर्यंत जिल्हा सत्र न्यायाधीशांच्या बंगल्याचा दरवाजा उघडला नाही, त्यामुळे मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. यानंतर एसपी अरविंद कुजूर घटनास्थळी दाखल झाले. खिडकीच्या बाहेरून पाहिलं असताना कांता मार्टिनचा मृतदेह पंख्याला टांगलेला दिसला.
पोलिस मार्टिन यांच्या आत्महत्येचं कारण शोधत आहेत. त्यांच्या घरात कोणतीही सुसाइड नोट सापडली नाही. या घटनेनंतर मुख्य न्यायदंडाधिकारी, कोर्टाचे कर्मचारी, वकील, पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिस आत्महत्येचे कारण शोधत आहेत. घरातून कोणतीही सुसाइड नोट सापडली नसल्याचे मुंगेलीचे पोलिस स्टेशन प्रभारी विश्वजितसिंग यांनी सांगितले. त्याचवेळी त्याचा मुलगा अंकित मार्टिन यांनाही घटनेविषयी काही सांगता आले नाही. (हेही वाचा - Bharatpur: मागील पंचायत निवडणुकांवरून झालेल्या भांडणात गोळीबार; दोन जणांचा मृत्यू)
दरम्यान, जबलपूर येथील रहिवासी कांता मार्टिन 24 मे 1994 रोजी न्यायालयीन सेवेत आल्या होत्या. राज्यातील विविध जिल्ह्यात सेवा दिल्यानंतर दीड वर्षापूर्वी मुंगेली येथे जिल्हा व सत्र न्यायाधीश म्हणून त्या तैनात झाल्या होत्या.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू असताना छत्तीसगड राज्यात अनेक गुन्हेगारीच्या घटना समोर येत आहेत. रविवारी भिलाई शहरातील नंदिनी रोडजवळ दीपावलीच्या रात्री एका युवकाचा मृत्यू झाला होता. रात्री दहाच्या सुमारास या व्यक्तीचा मृतदेह सापडला होता. त्याला पोस्टमार्टमसाठी मार्केरी येथे पाठविण्यात आले. या व्यक्तीला धारदार शस्त्राने वार करुन ठार मारण्यात आले होते. पोस्टमॉर्टमच्या पुष्टीनंतर कॅन्टोन्मेंट पोलिसांनी एफआयआर दाखल केला होता.