Bharatpur: मागील पंचायत निवडणुकांवरून झालेल्या भांडणात गोळीबार; दोन जणांचा मृत्यू
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: ANI)

Bharatpur: राजस्थानमधील भरतपूर येथे मागील पंचायत निवडणुकीत झालेल्या चुरशीमुळे दोन पक्षात दगडफेक व गोळीबार झाला. यात गोळ्या घालून एका महिलेचा आणि एका पुरुषाचा मृत्यू झाला आहे. तसेच जवळपास 6 जण जखमी झाले आहेत. ज्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे प्रकरण जुरहरा पोलिस स्टेशन परिसरातील बामणबाडी गावात संबंधित आहे. कामा येथील पोलिस सीओ प्रदीप यादव यांनी सांगितलं की, सरपंचपदाच्या निवडणुकीवरुन जवळपास 5 वर्षे गावात दोन्ही पक्षात भांडण झाले. आज दोन्ही पक्ष आमनेसामने आले आणि गोळीबार करण्यात आला.

या भांडणात सुमारे 6 जण गंभीर जखमी झाले असून, त्यात दोघांचा मृत्यू झाला आहे. सर्व जखमींना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले असून गावातील तणाव लक्षात घेता पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. (हेही वाचा - Bihar Elections 2020: NDA सरकार पुढील पाच वर्षे टिकणार, निवडणूकीत विजय झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी दिली प्रतिक्रिया)

यावेळी गावातील एका व्यक्तीने दगडफेक केल्याचा व्हिडिओ बनविला आहे. या व्हिडिओमध्ये असे दिसते आहे की, काही लोक छतावर चढून दुसर्‍या बाजूला दगड फेकत आहेत आणि त्यांच्या हातात शस्त्रेही आहेत.

पीडित पक्षाचे साहिल यांनी सांगितलं की, निवडणुका झाल्यापासून दोन्ही पक्षात तणावाचं वातावरण होतं. यातील आमच्या विरोधी पक्षाने आमच्या एका तरूणाला चापट मारली आणि त्यानंतर त्याने दगडफेक व आमच्यावर गोळीबार सुरू केला. यात आमच्या दोन कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला.