अनेक नाट्यपूर्ण घडामोडींनी सन 2020 (Goodbye 2020) हे वर्ष महत्त्वपूर्ण ठरले. कोरोना व्हायरस (Coronavirus) ही या वर्षातील सर्वात मोठी आणि तितकीच घातक देण ठरली. असे असले तरी इतरही क्षेत्रांसाठी हे वर्ष मोठे खळबळजनक घडले. प्रामुख्याने राजकीय क्षत्रात या वर्षी मोठ्या घडामोडी घडल्या (High Voltage Political Drama In 2020) . यात मध्य प्रदेश राज्यात सरकार कोसळून घडलेले सत्तांतर, बिहार विधानसभा निवडणूक, कोरोना काळात महाराष्ट्रामध्ये भाजप नेत्यांनी महाविकासआघाडी सरकारबाब निर्माण केलेले प्रश्नचिन्ह, राजस्थान राज्यात मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या नेतृत्वाखालील सरकारला अडचणीत आणण्याचे करण्यात आलेले प्रयत्न, यांसह अनेक घटना या वर्षी घडल्या. या घटनांवर टाकलेला हा एक कटाक्ष.
मध्य प्रदेश
विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठा हादरा बसला आणि शिवराजसिंह चौहाण यांच्या नेतृत्वाखाली 15 वर्षे सत्तेत असलेले भाजप सरकार पराभूत झाले. या ठिकाणी कमलनाथ यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस सरकार अस्तितत्वात आले. परंतू, तरुण असलेल्या ज्योतिरादित्य सिंधिया यांनी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्यासोबत उभा संघर्ष निर्माण केला. याची परिणीती ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या भाजप प्रवेशात झाली. त्यामुळे ज्योतिरादित्य यांच्यासोबत काही आमदार भाजपमध्ये गेले. त्यामुळे कमलनाथ यांचे सरकार कोसळले. शिवराज सिंह यांचे अल्पमतातील सरकार सत्तेत आले. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचे आमदार मोठ्या प्रमाणावर निवडूण आले. मध्य प्रदेशात भाजप सरकार स्थिर झाले. (हेही वाचा, Year Ender 2020: 'या' महत्त्वपूर्ण गोष्टींमुळे राजकीय क्षेत्रासाठी हे वर्ष ठरले अस्थिरतेचे)
महाराष्ट्र
विधानसभा निवडणूक 2019 युतीद्वारे एकत्र लढलेल्या शिवसेना-भाजप यांच्यात मुख्यमंत्री पदावरुन संघर्ष तीव्र झाला. त्यातून युती फुटली आणि भाजपला धोबीपछाड देत महाविकासआघाडी सत्तेत आली. तेव्हापासून भाजप अत्यंत आक्रमक आहे. सर्वाधिक आमदार असतानाही विरोधी पक्षात बसावे लागल्याने भाजप नेतृत्वावर मोठा दबाव आहे. त्यामुळे ठाकरे सरकार टिकणार नाही असे भाजप नेते सातत्याने सांगत आहेत. त्यामुळे या वर्षा भाजप नेत्यांनी राज्यपालांनी घेतलेल्या भेटीचा उंच्चांक घडला. राज्यात राष्ट्रपती राजवट लावा अशी मागणीही अनेकांकडून करुन झाली. परंतू, अद्यापपर्यंत तरी महाविकासआघाडी सरकार स्थिर आहे.
बिहार
बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीए सत्तेवर आली परंतू नितीश कुमार यांच्या जेडीयूचे संख्याबळ प्रचंड घटले. दुसऱ्या बाजूला दिवंगत रामविलास पासवान यांच्या लोकजनशक्ती पक्षाने एनडीएविरोधात भूमिका घेत बिहारमध्ये निवडणूक लढवली. त्याचा परिणाम भजपला मोठे यश तर जदयूचे संख्याबळ कापण्यात झाला. त्यामुळे बिहारमध्य जनतादलाचा अपवाद वगळता अमदार निवडूण आला नाही. मात्र, बिहारमधील सर्वात मोठा पक्ष ठरण्याचा बहुमान राष्ट्रीय जनता दलाने आपल्याकडे कायम ठेवला. सध्या नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली बिहारमध्ये भाजप प्रणीत एनडीएचे सरकार सत्तेवर आहे.
राजस्थान
राजस्थानमध्येही सर्व काही अलबेल होते. मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस सरकार ठिक चालले होते. मध्येच अचानक सचिन पायलट यांनी आपल्या शिडात बंडाची हवा भरली आणि मामला गडबडला. गहलोथ यांचे सरकार अल्पमतात आले. काही वेळा तर सरकार कोसळते की काय अशी स्थिती निर्माण झाली. परंतू, सचिन पायलट यांनी काँग्रेस न सोडल्याने आणि वेळीच तोडगा निघाल्याने गहलोत सरकार वाचले.