Uttarakhand CM: उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री कोण होणार? BJP ची आज महत्वपूर्ण बैठक
Tirath Singh Rawat (Photo Credits-ANI)

Uttarakhand CM: उत्तराखंड मधील राजकरणाच्या जोरदार चर्चा सुरु आहेत. अशातच काल उत्तराखंडचे मुख्यमंत्री तिरथ सिंह रावत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता राज्याचा नवा मुख्यमंत्री कोण? यावर निर्णय घेण्यासाठी आज दुपारी उत्तराखंडच्या भाजप पक्षाची एक महत्वपूर्ण बैठक पार पडणार आहे. ही बैठक पक्षाचे उत्तराखंड अध्यक्ष मदन कौशिक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे. अद्याप मुख्यमंत्री पदासाठी कोणत्या नावांचा विचार केला जात आहे हे स्पष्ट करण्यात आलेले नाही. मात्र असे जरुर म्हटले जात आहे की, यावेळी एखाद्या आमदारालाच मुख्यमंत्री पद दिले जाणार आहे.

उत्तराखंडचे भाजप मीडिया प्रभारी मनवीर सिंह चौहान यांनी असे म्हटले की, पक्षातील सर्व आमदारांना या बैठकीला उपस्थितीत राहण्याचे आदेश दिले आहेत. कौशिक यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी दुपारी 3 वाजता बैठक होणार आहे. यामध्ये केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर केंद्रीय पर्यवेक्षकच्या रुपात बैठकीला उपस्थितीत राहणार आहेत. कौशिक यांनी स्पष्ट केले आहे की, बैठकीत अजेंडाबद्दल पुढील मुख्यमंत्री आमदारांमधूनच निवडला जाणार आहे.(फाटलेल्या जीन्सनंतर उत्तराखंड सीएम Tirath Singh Rawat यांचे अजून एक वादग्रस्त विधान- 'जास्त रेशन हवे होते तर दोन मुलांऐवजी 20 मुलांना जन्म द्यायचा होता' Watch Video)

यापूर्वी तिरथ सिंह रावत यांनी दिल्लीतील गृहमंत्री अमित शहा आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतल्यानंतर 48 तासांमध्ये आपल्या पदाचा राजीनामा दिला. तर पौडी गढवाल येथून खासदार रावत यांना 10 मार्च रोजी राज्याच्या मुख्यमंत्री पदाची सुत्रे सांभाळण्यास दिली होती. माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांना पदावरुन हटवण्यात आले होते. तर तीरथ हे आमदार नव्हते त्यामुळे नियमानुसार पदावर कायम राहण्यासाठी त्यांना 9 सप्टेंबर पूर्वी त्यांना विधानसभा निवडणूकीत विजय मिळवायचा होता. दरम्यान, उत्तराखंड विधानसभा निवडणूक 2022 रोजी पार पडणार आहे.

आपल्या चार महिन्याच्या कार्यकाळानंतर तीरथ सिंह यांनी असे म्हटले की, संवैधनिक संकटाच्या कारणामुळे त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. यापूर्वी असे समोर आले होते की, शाह आणि नड्डा यांच्या बैठकीनंतर अशी चर्चा सुरु होती की भाजपचे आमदार आणि रावत यांच्यामध्ये मतभेद असल्याने वरिष्ठ नेत्यांनी आमदारांच्या समर्थनाचा दावा केला होता. तसेच एका वरिष्ठ भाजप नेत्यांनी संकेत दिले की, निवडणूक आयोग कोविडच्या कारणामुळे पोटनिवडणूक न घेण्याच्या विचारात असल्याने रावत यांना राजीनामा द्यावा लागला.