BJP MP from Bulandshahr Bhola Singh | (Photo Credits: ANI)

Lok Sabha Ealections 2019: उत्तर प्रदेश राज्यातील बुलंदशहर लोकसभा मतदारसंघ (Bulandshahr Lok Sabha Constituency) भाजप (BJP) उमेदवार भोला सिंह (Bhola Singh) यांच्यावर मोठा निर्णय घेत कडक कारवाई करण्यात आली आहे. भोला सिंह यांना नजर कैदेत ठेवण्याचे आदेश देण्यात आले असून, त्यांना मतदान पार पडत असलेल्या सर्व मतदान केंद्रावर जाण्यास प्रतिबंद (बंदी) करण्यात आला आहे.

बुलंदशहर लोकसभा मतदारसंघात लोकसभा निवडणूक 2019 साठी दुसऱ्या टप्प्याचे मतदान आज ( गुरुवार, 18 एप्रिल2019) पार पडत आहे. या मतदान प्रक्रियेदरम्यान, मतदारसंघातील जेपी जनता इंटर कॉलेज मतदान केंद्रात जाऊन भोला सिंह यांनी मतदारांना आकर्शित करण्याचा आणि आमिश दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या वर्तनावर जिल्हाधिकाऱ्यांनी कडक कारवाई करत नजरकैद आणि मतदान केंद्रावर जाण्यास प्रतिबंद लावण्याचे आदेश दिले.

भोला सिंह यांच्या बेजबाबदार वर्तनाबाबत अज्ञात व्यक्तीने जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. भोला सिहं यांनी जेपी जनता इंटर कॉलेज येथे जाऊन निरिक्षण केले तसेच मतदारांना आकर्शित करण्याचा प्रयत्न केला. तसेच, ते EVM जवळही गेले आसा भोला सिंह यांच्यावर आरोप आहे. आलेल्या तक्रारीची गंभीर दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी भोला सिंह यांना नोटीस बजावली आहे.

आचारसंहितेचे उल्लंघन करणे तसेच इतर उमेदवारांकडून दाखल झालेल्या तक्रारींची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी भोला सिंह यांना नजरकैदेत ठेवण्याचे आदेश दिले. हे आदेश जिल्हाधिकारी अभय सिंह यांनी दिले. भोला सिंह यांना नजरबंद करण्यासाठी जिल्हाधिकारी आणि, एसडीएम यांच्यासह इतर अधिकाऱ्यांचे एक पथकही रवाना झाले आहे. (हेही वाचा, पंतप्रधान मोदी यांचे हेलिकॉप्टर तपासणी करणारे IAS अधिकारी मोहम्मद मोहसिन निलंबित; निवडणूक आयोगाची करावाई)

भोला सिंह यांच्याशी संवाद करुन अमर उलाजाने दिलेल्या वृत्तानुसार, लोक मतदान करुन मतदान केंद्राबाहेर पडत होते. ते लोक मोदी.. मोदी.. अशा घोषणा देत होते. मी त्यांना केवळ धन्यावाद म्हणालो, असे भोला सिंह यांनी म्हटले आहे. आपण कोणत्याही प्रकारे आचारसंहिता उल्लंघन केले नाही. मतदान केंद्रामध्ये कशी व्यवस्था आहे हे पाहण्यासाठी केवळ आपण तेथे गेलो होतो. पण, मी EVM जवळ गेलो नव्हतो, असेही भोला सिंह यांनी म्हटले आहे. तुम्ही EVM जवळ गेला होतात असा आरोप होत असल्याबद्दल प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

दरम्यान, प्रसारमाध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत जिल्हाधिकारी अभय सिंह यांनी म्हटले आहे की, कोणताही उमेदवार मतदान केंद्रावर जाऊ शकतो. निरिक्षण करु शकतो. मात्र, तो EVM जवळ जाऊ शकत नाही. त्याला तिथे जाता येणार नाही.