पंतप्रधान मोदी यांचे हेलिकॉप्टर तपासणी करणारे IAS अधिकारी मोहम्मद मोहसिन निलंबित; निवडणूक आयोगाची करावाई
PM Modi | (Photo credit: File Photo, facebook/pg/narendramodi)

Lok Sabha Elections 2019: निवडणूक आयोगाने मोहम्मद मोहसिन (Mohammed Mohsin) नावाच्या एका IAS दर्जाच्या अधिकाऱ्याला निलंबित केले आहे. मोहम्मद मोहसिन हे कर्नाटक (Karnataka) राज्यातील 1996 च्या बॅचचे अधिकारी आहेत. त्यांना ओडीसा राज्यात संबलपूर येथे Election General Observer म्हणून नियुक्त करण्यात आले होते. मोहसिन यांनी पंतप्रधान मोदी यांच्या ताफ्यातील हेलिकॉप्टर तपासणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मोहसिन यांना तपासणी करण्याच्या त्यांच्या कर्तव्यापासून रोखण्यात आले. त्यानंतर निवडणूक आयोगाने त्यांना निलंबित केल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे.

प्राप्त माहितीनुसार, IAS अधिकारी मोहसिन आणि त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्या ताफ्याची तपासणी करण्याचा केलेला प्रयत्न त्यावरुन निर्माण झालेले वादळ. या प्रकरणाची पंतप्रधान कार्यालयाने गंभीर दखल घेतली. त्यानंतर निवडणूक आयोगाचे अधिकारी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी ओडीसालाही गेले होते. पीएमओने या प्रकरणात हस्तक्षेप केल्यानंर निवडणूक आयोगाने मोहम्मद मोहसिन यांना निलंबित केल्याचे वृत्त 'आज तक'ने दिले आहे. एसपीजी सुरक्षा प्राप्त व्यक्तिबाबत असलेल्या नियम आणि संकेतांचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली अधिकारी मोहसिन यांना निलंबित करण्यात आले. निवडणूक आयोग या वेळी जोरदार कार्यरत झाला आहे. बेजबाबदार आणि आक्षेपार्ह विधाने करणाऱ्या अनेक उमेदवारांवर निवडणूक आयोगाने काही तासांची प्रचार बंदी लावली आहे. (हेही वाचा, अखेर Jet Airways ची सेवा बंद, काल रात्री घेतले शेवटच्या विमानाने उड्डाण; 10 मे रोजी होणार बोली प्रक्रियेवर निर्णय)

पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी ओडीसाच्या दौऱ्यावर होते. त्यांनी ओडिसातील संबलपूर येथे निवडणूक प्रचार केला. कर्नाटक राज्याचे 1996 च्या बॅचचे आएएस अधिकारी मोहम्मद मोहसिन हे येथे जनरल ऑब्जर्वर म्हणून नियुक्त होते. त्यांनी पंतप्रधानांच्या ताफ्याची तपासणी करण्याचा प्रयत्न केला. मोहसिन यांच्या या निर्णयामुळे नाराज झालेल्या पंतप्रधान कार्यालयाने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. त्यानंतर निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांचे एक पथक पूर्ण प्रकरण आणि त्याचा घटनाक्रम जाणून घेण्यासाठी ओडिसाला रवाना झाले. निवडणूक आयोगाने सर्व प्रकरण जाणून घेत आणि निवडणूक आयोगाने आखून दिलेल्या निर्देशांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत अधिकारी मोहम्मद मोहसिन यांना निलंबित केले. (हेही वाचा, Effects Of Demonetisation: नोटबंदी निर्णयाच्या तडाख्यात 50 लाख लोकांच्या नोकऱ्या गेल्या - अहवाल)

दरम्यान, 'जनसत्ता डॉट कॉम'ने ओडिसा सरकारमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा हवाला देत म्हटले आहे की, अधिकारी मोहम्मद मोहसिन यांनी पंतप्रधानांच्या हेलिकॉप्टरची तपासणी करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्याकडे केवळ निवडणूक निरिक्षक म्हणून जबाबदारी होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सभेत भाषण करत होते तेव्हा, अधिकारी मोहसिन हे मोदी यांच्या हेलिकॉप्टरजवळ गेले. त्यांनी हेलिकॉप्टरजवळ असलेल्या एसपीजीकडे चौकशीची मागणी केली. त्यांनी एसपीजीकडे आवश्यक कागदपत्रांची मागणी केली. या सर्व प्रकारात पंतप्रधानांना पुढील मार्गक्रमण करण्यसाठी 20 मनिटे उशीर झाला. मात्र, जनरल ऑब्जर्वर (मोहसिन) केवळ निवडणूक आयोगाचे काम पाहतो आणि निवडणूक आयोगालाच अहवाल आणि माहिती देतो. अशा प्रकारे तपासणी करण्याचे कोणतेही अधिकार त्याला मिळालेले नसतात, असेही या वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले आहे.