Photo Credit - Facebook

Srinivas Pawar on Ajit Pawar : अजित पवार (Ajit Pawar)यांनी शरद पवारांची साथ सोडत महायुती जवळ केली. त्यानंतर पवार कुटुंबात मोठी फुट पडली. आता त्यांच्यातील ही तफावत दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. नुकत्याच झी मीडियाला दिलेल्या मुलाखतीत श्रीनिवास पवार (Srinivas Pawar) यांनी सख्खा भाऊ अजित पवारांचा नालायक (worthless) असा उल्लेख केला आहे. त्याशिवाय, त्यांनी अजित पवार यांच्यात झालेल्या बदलांवरही भाष्य केलं. 'साहेबांचे 83 वय झाले आहे. या वयात त्यांना सोडणे मला पटले नाही. वयस्कर झालेल्या माणसाची आपण किंमत करत नाही, अजित पवारांचा हा विचारच मला वेदना देऊन गेला.' असे म्हणत त्यांनी अजित पवारांवर ताशेरे ओढले.(हेही वाचा: Ajit Pawar यांना सर्वोच्च न्यायालयाचा दणका; Sharad Pawar यांचा फोटो, नाव न वापरण्याचं हमीपत्र सादर करण्याचे आदेश)

पुढे बोलताना ते म्हणाले की, "मी काही राजकारणी नाही, मला जे पटत नाही ते मी करत नाही. औषधांनी जशी एक्सपायरी डेट असते तशी काही नात्यांची देखील एक्सपायरी डेट असते. मला 60 व्या वर्षी दबून जगायचे नाही. ताट मानेने व स्वाभिमानाने जगायचे आहे. केवळ कुणीतरी लाभार्थी आहे म्हणून त्याच्या पाठीमागे जायचे हे बरोबर नाही. मला नाही वाटत त्यांना सुद्धा झोप येत असेल," असेही श्रीनिवास पवार म्हणाले. (हेही वाचा: Vijay Shivtare On Ajit Pawar: अजित पवार 'नीच आणि उर्मट', एकनाथ शिंदे यांच्या जवळच्या नेत्याकडून जहरी टीका; बारामतीतून अपक्ष लढणार)

"साहेबांनी आजपर्यंत काय केलं हा प्रश्न विचारणाऱ्यांनी उत्तर देत ते म्हणाले की, त्या साहेबांनी आपल्याला चार वेळा उपमुख्यमंत्री केले. 25 वर्ष मंत्री केलं. मला जर असा काका मिळाला असता तर मी खूश झालो असतो. भाजपने साहेबांना संपवायचा खूप प्रयत्न केला. घरातला कोणीतरी फोडल्याशिवाय ते घर संपत नाही हे इतिहास आहे. घर एक असेल तर ते संपू शकत नाही. पण, घरातला माणूसच घरच्यांना घाबरत नाही अशी परिस्थीती सध्या आहे. साहेब जर दहा वर्षांपूर्वीचे असते त्यांनी काय केले असते हे तुम्हाला हे ठाऊक आहे.", असे श्रीनिवास पवार म्हणाले.

साहेब कधी कुणाला आवाज चढवून बोलले नाही, वीस पंचवीस वर्ष साहेबांनी राज्य सोपवलं होतं आणि ते दिल्लीत होते. मी माझा कारखाना माझ्या मुलाकडे सोपवला आहे. वीस वर्षांनी जर मी तिकडे गेलो तर वॉचमनच मला सुद्धा आत सोडणार नाही. आपण खेडेगावातली माणसं आहोत, मरेपर्यंत आई-वडिलांना सांभाळतो त्यांचा औषध पाणी करतो," अशा भावना श्रीनिवास पवार यांनी व्यक्त केल्या.