निवडणूक आयोगाने अजित पवारांना एनसीपी पक्ष आणि घड्याळ हे पक्ष चिन्ह दिलं असलं तरीही सर्वोच्च न्यायालयाने आज सुनावणी दरम्यान अजित पवार आणि त्यांच्या गटाला शरद पवार यांचा फोटो, नाव न वापरण्याच्या सूचना दिल्या आहेत. येत्या सोमवारपर्यंत सुप्रीम कोर्टाने अजित पवारांना शरद पवारांचे नाव प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे वापरणार नाही असं बिनशर्त हमीपत्र द्या असंही म्हटलं आहे. तसेच गोंधळ टाळण्यासाठी 'घड्याळ' हे चिन्ह देखील न वापरण्याच्या सूचना देखील त्यांनी तोंडी केल्या आहेत.
पहा ट्वीट
Supreme Court Asks Ajit Pawar Group To Not Use Sharad Pawar's Name & Photo In Posters; Suggests 'Clock' Symbol Be Not Used | @awstika
"Stick to your identity," Court told Ajit Pawar@PawarSpeaks @AjitPawarSpeaks @NCPspeaks #NCP #SharadPawar #AjitPawarhttps://t.co/tugFQOMKKN
— Live Law (@LiveLawIndia) March 14, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)