Vijay Shivtare and Ajit Pawar | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

शिवसेना नेते आणि माजी आमदार विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवनिर्वाचित अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar) यांना थेट आव्हान दिले आहे. अजित पवार हे नीच आणि उर्मट आहेत. त्यांना लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) धडा शिकवणार म्हणजे शिकवणारच. बारामती (Baramati Constituency) हा काही पवारांचा सातबारा नाही. देशातील शेकडो लोकसभा मतदारसंघांपैकी तोसुद्धा एक मतदारसंघच आहे. त्या ठिकाणी कोणीही निवडणूक लढवू शकतो आणि येथील जनतेची इच्छा आहे की, मी निवडणूक लढवावी, असे म्हणत शिवतारे यांनी लोकसभा निवडणूत 2024 चे रणशिंग फुंकले आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील आगामी सामना सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा होईल असे मानले जात होते. पण, शिवतारे यांच्या घोषणेमुळे राजकारण तापले आहे.

अजित पवार हे प्रचंड अहंकारी आणि गुर्मी असलेले नेते आहेत. खरेतर बारामतीतील मतदारांनीच हा ब्रह्मराक्षस निर्माण केला आहे. ज्याने आता सर्वच आघाड्यांवर नीच पातळी गाठली आहे, असे विजय शिवतारे यांनी म्हटले आहे. सासवड येथे आज (13 मार्च) घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. बारामती मतदारसंघात आजवर पवारांना मिळालेले लीड पाहता ते पाच ते सहा लाखांचे आहे. पण त्यांच्या विरोधात मिळालेलेल मतदानही कमी नाही. त्यामुळे आगामी निवडणुकीत होणारा सामना सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे असा होणार नाही. या ठिकाणी आमची लढत ही सुनेत्रा पवार यांच्याविरोधता नाहीच. हा सामना थेट सुप्रिया सुळे विरुद्ध विजय शिवतारे असा होणार असल्याचे ते म्हणाले. (हेही वाचा, Ajit Pawar On Koyta Gang : 'कार्ट्यांना नीट वागायला शिकवा नाहीतर, आता डायरेक्ट टायरमध्ये...'; पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीवर अजित पवारांनी पालकांना सुनावले)

अजित पवार महायुतीसोबत आल्यानंतर मी त्यांचे स्वागत केले. पण, ती माझी व्यक्तीगत भूमिका नव्हती. पक्षाचा नेता म्हणून मी गेलो होतो. मी 23 दिवस लीलावती रुग्णालयातदाखल होतो. तेव्हा अजित पवार यांनी माझ्यावर व्यक्तीगत टीका केली. मी अँम्बूलन्स मधून प्रचार केला तर म्हणाले लोकांची सहानुभूती मिळविण्यासाठी अशा प्रकारे प्रचार सुरु केला. माझी गाडी, त्याची कंपनी यावरुनही टीका केली. राजकारणातील इतकी नीच पातळी कधीच कोणी गाठली नाही. मला म्हणाले, शिवतारे कसा निवडून येतो तेच पाहतो. उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे मी जर ठरवलेच तर कोणाच्या बापाला ऐकत नाही. म्हणजे राजकारणात एखादी सकारात्मक गोष्ट पाहण्याऐवजी अजित पवारांनी नकारात्मक प्रचार केला आणि मला त्रास दिला, या सर्व गोष्टी स्वाभिमानाशी निगडीत आहेत. मी सामान्य माणूस आहे. सामान्य माणसांचा, मतदारांचा मला पाठिंबाआहे. त्यामुळे बारामती लोकसभा मतदासंघात मी उमेदवारी करणारच. गरज पडल्यास अपक्ष निवडणूक लढवणार, असा इरादाही विजय शिवतारे यांनी बोलून दाखवला.