Shiv Sena : संतोष बांगर यांच्या शक्तीप्रदर्शनात दस्तूरखुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सहभाग
Eknath Shinde | (Photo Credit - Facebook)

हिंगोलीतील (Hingoli) कळमनुरीचे शिवसेना आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांना उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मोठा धक्का दिला. बांगर यांना काल शिवसेना (Shiv SEna) हिंगोली जिल्हाध्यक्ष पदावरुन हटवण्यात आलं. बांगर हे शिवसेनेतून बंडखोरी करुन शिंदे गटात सहभागी झाल्यानंतर हिंगोली जिल्ह्यातील शिवसैनिकांकडून बांगरांविषयी नाराजी व्यक्त केली जाऊ लागली होती. त्यानंतर संतोष बांगरांची जिल्ह्यध्यक्ष पदावरुन हकालपट्टी करण्यात आली. आज बांगरांनी  मुंबई गाठत सह्याद्री (Sahyadri) अतिथीगृहाबाहेर समर्थकांसह जोरदार शक्तीप्रदर्शन केले. यावेळी इतर बंडखोर आमदारांसह  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी देखील संतोष बांगर ह्यंच्या शक्ती प्रदर्शनास हजेरी लावली.

 

काल उध्दव ठाकरेंच्या निर्णयाप्रमाणे बांगर ह्याची  हिंगोली जिल्हाध्यक्ष पदावरुन हकालपट्टी करण्यात आली. पण आज एकनाथ शिंदेंनी बांगर ह्यांना पाठींबा दर्शवत संतोष बांगरचं जिल्हाप्रमुख असं म्हणत थेट माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे ह्याच्या निर्णयाला आव्हान दिले. संतोष बांगर यांच्या शक्तीप्रदर्शना दरम्यान  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ह्यांनी शिवसैनिकांना संबोधित केलं. त्यांनी सगळ्या बंडंखोर शिवसैनिकांचे आभार मानत त्यांचे कौतुक केले. तसेच म्हणाले की सर्व सामान्य शिवसैनिकांच्या बंडाची दखल फक्त महाराष्ट्रानेच नाही तर देशासह जगाने घेतली ह्याचा मला अभिमान वाटतो. (हे ही वाचा :- Maharashtra Flood : पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या पूर आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना 50 हजारांचं प्रोत्साहनपर अनुदान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे)

 

दरम्यान त्यांनी धर्मवीर आनंद दिघेंसह (Dharmaveer Anand Dighe) बाळासाहेब ठाकरेंचा (Balasaheb Thackeray) उल्लेख त्यांच्या संबोधनात केला. मी एकटा नाही, तर तुम्ही सर्वजण मुख्यमंत्री आहात असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसैनिकांना म्हणाले. तसेच हे सर्वसामान्यांचं आणि बाळासाहेबांच्या स्वप्नातील शिवसेना-भाजपा युतीचं सरकार आहे. आपल्या भूमिकेचं स्वागत महाराष्ट्रातील सर्वांनी केलं आहे. आषाढीला पंढरपूरला गेलो तेव्हा लोकांनी जे प्रेम दिलं, स्वागत केलं ते विसरु शकत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भावनिक साद देत त्यांच्या गटातील आमदारांचा अभिनंदन केलं.