All About  Sunanda Pushkar Death Case: सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणी शशि थरूर  दोषमुक्त; काय आणि कसे घडले? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
hashi Tharoor With Sunanda Pushkar | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

काँग्रेस (Congress) नेते शशि थरुर (Shashi Tharoor) यांना सुनंदा पुष्कर मृत्यू (Sunanda Pushkar Death Case) प्रकरणात दिल्लीतील एका न्यायालयाने आरोपमुक्त केले आहे. त्यानंतर शशि थरुर यांनी न्यायालयाचे आभार मानले आहेत. पाठिमागील साडेसात वर्षे छळणुकी पेक्षा वेगळी नव्हती. मात्र न्यायालयाचा हा निर्णय मोठा दिलासा घेऊन आला असल्याची भावना शशि थरुर यांनी व्यक्त केली आहे. 17 जानेवारी 2014 या दिवशी दिल्ली येथील एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये थरुर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर (Sunanda Pushkar) यांचा मृतदेह आढळून आला होता. हा मृतदेह संशयास्पद रित्या आढळून आल्याचा दिल्ली पोलिसांचा दावा होता. तसेच, या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी पती शशी थरुर यांच्याविरोधात भारतीय दंड संहिता कलम 498 (अ) आणि 306 (आत्महत्येस प्रवृत्त करणे) अन्वये गुन्हा दाखल केला होता. प्रकरण न्यायप्रविष्ठ होते. अखेर न्यायालयाने थरुर यांना दोषमुक्त केले.

विशेष न्यायाधीश गीतांजली गोयल यांच्या खंडपीठापुढे झालेल्या ऑनलाईन सुनावणीत सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणाचा आदेश देण्यात आला. शशि थरुर यांच्या वतीने न्यायालयात बाजून मांडणारे वकील विकास पहवा यांनी न्यायालयाला निदर्शनास आणून दिले की, एसआयटी द्वारा करण्यात आलेली चौकशी राजकीय नेत्याविरुद्ध (थरुर) लावण्यात आलेल्या आरोपांपासून मुक्तता देते.

सुनंदा पुष्कर यांचा मृतदेह (17 जनवरी 2014) ज्या दिवशी मिळाला त्या दिवशी दाम्पत्य (थरुर आणि पुष्कर) दिल्लीतील हॉटेलमध्ये वास्तव्यास होते. कारण त्यांचे अधिकृत निवासस्थान असलेल्या बंगल्याचे नुतनीकरण सुरु होते. पुष्कर यांच्या मृत्यूमुळे एकच खळबळ उडाली. कारण हे प्रकरण हायप्रोफाईल होते. तसेच, त्या काळात पाकिस्तानी पत्रकार मेहर तरार यांच्याशी थरुर यांचे कथीत प्रेमसंबंध असल्याची चर्चा होती. यातून थरुर, पुष्कर आणि मेहेर यांच्यात ट्विटरवरही काही टिप्पणी झाली होती. त्यानंतर अल्पावधीतच पुष्कर यांचा मृत्यू झाला. त्यामुळे या मृत्यूस थरुर यांच्या कथीत प्रेमसंबंधांच्या नजरेतूनही पाहिले गेले. तसेच, थरुर यांना जबाबदार धरण्यात आले. वास्तवात थरुर यांचा पुष्कर यांच्या मृत्यूशी संबंध नसल्याचे न्यायालयाच्या निर्णयातून निष्पण झाले आहे.

Shashi Tharoor With Sunanda Pushkar | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

सुनंदा पुष्कर यांचा मृत्यू शशि थरुर यांच्याशी विवाहबद्ध झाल्याच्या तीन वर्षे तीन महिने 15 दिवसांनी झाला. दोघांनी 2010 मध्ये 22 ऑगस्ट या दिवशी विवाह केला होता. 23 जानेवारी 2010 रोजी सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणाचा तपास दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेला देण्यात आला. त्यानंतर हे प्रकरण दोनच दिवसात (25 जानेवारी) पुन्हा दिल्ली पोलिसांकडे सोपविण्यात आले.

व्हिडिओ

दिल्ली पोलिसांनी 2018 मध्ये पती शशि थरुर यांच्यावर पत्नी सुनंदा पुष्कर यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप केला. तसेच, परिस्थितीजन्य पुरावे हे थरुर यांच्या विरोधात असून, तपासाची आवश्यकता असल्याचेही म्हटले होते. दिल्ली पोलिसांनी थरुर यांना भारतीय दंड संहिता कलम 498 (पत्नीचा पतीद्वारे किंवा पतीच्या नातेवाईकांकडून छळ करणे) आणि 306 अन्वये आरोपी करण्यात आले. या प्रकरणात गुन्हा दाखल झाला परंतू, थरुर यांना अटक मात्र झाली नाही. या प्रकरणात 2018 मध्ये थरुर यांना जामीन देण्यात आला होता.