Adhir Ranjan Chaudhary: नाम है अधीर लेकिन उनका दिमाग हो गया है बधीर, कवितेच्या माध्यमातून रामदास आठवलेंची अधीर रंजन चौधरींवर टीका
Ramdas Athawale | (Photo Credit : Facebook)

केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Aathawale) आणि त्यांच्या कविता या संपूर्ण देशात प्रसिध्द आहेत. कुणाचं कौतुक करायचं असो कुठल्या निर्णयाचं स्वागत वा कुणावर टीका रामदास आठवले कायमचं त्याच्या विशेष काव्यात्मक शैलीतून आपली प्रतिक्रीया देताना दिसतात. गेल्या दोन  दिवसांपासून लोकसभेत तापलेला विषय म्हणजे अधीर रंजन चौधरींनी (Adhir Ranjan Chaudhary) देशाच्या नवनिर्वाचीत राष्ट्रपती द्रौपदी मूर्मूवर (President Draupadi Murmu) केलेलं वक्तव्य. कॉंग्रेसचे जेष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांनी पत्रकारांशी संवाद साधताना राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांचा राष्ट्रपत्नी असा उल्लेख करत राष्ट्रपतींचा अपमान केला अशी टीकेची झोड सत्ताधारी पक्ष म्हणजे भाजपने (BJP) उठवली आहे. तर अधीर रंजन चौधरींसह कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी माफी मागावी अशी मागणी केल्या जात आहे.

 

अधीर रंजन चौधरींच्या या वक्तव्यावर संपूर्ण देशभरातून विविध प्रतिक्रीया उमटताना दिसत आहेत. तर लोकसभेतील (Loksabha) पावसाळी अधिवेशनात (Monsoon Session 2022) ह्याचे तीव्र प्रतिसाद बघायला मिळालेत. संबंधीत वक्तव्यावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी देखील काव्यात्मक स्वरुपात अधीर रंजन चौधरींवर टीका केली आहे. रामदास आठवले म्हणाले, अधीर रंजन चौधरी का नाम है अधीर लेकिन उनका दिमाग हो गया है बधीर. तसेच आठवले म्हणालेत अधीर रंजन चौधरींनी फक्त राष्ट्रपती द्रौपदी मूर्मूंचा नाही तर संपूर्ण देशाचा आणि महिलांचा अपमान केला आहे. (हे ही वाचा:-Adhir Ranjan Chaudhary यांनी राष्ट्रपती Draupadi Murmu यांच्यावर केलेल्या वक्तव्यावर संसदेत गदारोळ, काँग्रेसने देशाची माफी मागावी Nirmala Sitharaman यांची मागणी)

 

अधीर रंजन चौधरींच्या या आक्षेपार्ह विधानाचे पडसाद संपूर्ण देशात उठताना दिसत आहे. महिला आयोगासह विविध स्तरातून अधीर रंजन चौधरींवर टीका होत आहे. तर संबंधीत विधावरुन काल लोकसभेतही मोठा गदारोळ झाला. संबंधीत वक्तव्यावर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) अॅक्शन मोड मध्ये दिसून आल्यात. तर अधीर रंजन चौधरी त्याच्या या विधानाबाबत माफी मागणार का आणि कॉंग्रेस अधीर रंजन चौघरींच्या या वक्तव्यावर काय भुमिका घेत हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.