प्रियंका चतुर्वेदी (फोटो सौजन्य-IANS)

काँग्रेस (Congress) पक्षातील राष्ट्रीय प्रवक्ता प्रियंका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांनी पक्ष सोडला आहे. याबद्दल त्यांनी आपल्या अधिकृत ट्वीटरवरुन ट्वीट करत ही माहिती दिली आहे. तर आता प्रियंका यांनी ट्वीटरवर स्वत:ला कॉलमिस्ट-ब्लॉगर-मदर असे म्हणवून घेतले आहे. सूत्रांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार प्रियंका शिवसेनेच्या संपर्कात आहेत. त्यामुळे प्रियंका आता शिवसेनेत (Shiv Sena) प्रवेश करणार का याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहेत.

बुधवारी प्रियंका यांनी काँग्रेस पक्षावर आरोप करत असे म्हटले की, मेहनत करणाऱ्यांपेक्षा पक्षात गुडांनाच जास्त मान दिला जातो. तसेच कार्यकर्त्यांनी प्रियंका यांच्या प्रती केलेल्या वर्तनाचा खुलासासुद्धा ट्वीटच्या माध्यमातून त्यांनी केला होता. ट्वीटरवरील पत्रानुसार काही महिन्यांपूर्वी प्रियंका यांनी राफेल डील वरुन मथुरा येथे पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. त्यावेळी पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी त्यांच्यासोबत गैरवर्तन केले होते.(हेही वाचा-गुजरात: भरसभेत काँग्रेस नेते हार्दिक पटेल यांच्या कानशिलात लगावली (Watch Video)

कार्यकर्त्यांच्या गैरवर्तानाची तक्रारसुद्धा पक्षाकडे केली होती. मात्र पक्षाने त्यांना निलंबितसुद्धा केले होते.तर ट्वीटमधून भावना व्यक्त करत त्यांनी असे म्हटले आहे की. पक्षासाठी खुप कष्ट करणाऱ्या नेत्यांना मान दिला जात नसून गुडांना मान दिला जात आहे. तसेच पक्षातील काहींनी मला धमकावले ते मात्र वाचले. अशा लोकांविरोधात कारवाई न करणे म्हणजे दुर्भाग्यच होय.

प्रियंका यांनी केलेल्या ट्वीटवर त्यांना काहींनी पाठिंबा दर्शवला. तसेच काँग्रेस पक्षातील मुजोरी नेत्यांवर कारवाई करावी अशी सुद्धा मागणी करण्यात आली होती. मात्र त्यानंतर प्रियंका ट्वीटरवरुन गायब झाल्या होत्या.