काँग्रेसमध्ये दाखल झालेले पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल (Hardik Patel) हे लोकसभा निवडणूक 2019 (Loksabha Elections 2019) च्या पार्श्वभूमीवर गुजरात (Gujarat) मधील सुरेंद्र नगर (Surendranagar) येथील प्रचारसभेत बोलत असताना एका व्यक्तीने मंचावर येत चक्क हार्दिक पटेल यांच्या श्रीमुखात भडकवली. त्यानंतर त्या व्यक्तीत आणि हार्दिक पटेल यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली आली. या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. (काँग्रेस नेते हार्दिक पटेल यांना गुजरात हायकोर्टाचा झटका; लोकसभा निवडणूक लढवण्यावर बंदी)
ANI ट्विट:
#WATCH Congress leader Hardik Patel slapped during a rally in Surendranagar,Gujarat pic.twitter.com/VqhJVJ7Xc4
— ANI (@ANI) April 19, 2019
हार्दिक पटेल प्रचारसभेला संबोधित करत असताना एक व्यक्ती मंचांवर आला आणि त्याने हार्दिक पटेल यांच्या कानशिलात लगावली. मात्र ही व्यक्ती कोण आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. हा हल्ला भाजपने घडवून आणल्याचे हार्दिक पटेल यांनी सांगितले. मला मारण्याचा भाजपाचा डाव असल्याने ते असे हल्ले करत असल्याचे हार्दिक पटेल यांनी म्हटले आहे.
कालच नवी दिल्लीतील भाजप मुख्यालयात सुरु असलेल्या पत्रकार परिषदेत नरसिम्हा राव या भाजप नेत्यावर बूट फिरकवल्याची घटना घडली होती. भष्ट्राचाराविरुद्ध भाजप सरकार कोणतेही पाऊल उचलत नसल्याने संतप्त झालेल्या कानपूर येथील डॉ. शक्ती भार्गव यांनी हे कृत्य केले.