पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात' कार्यक्रमातील महत्वाचे मुद्दे
File Image of Narendra Modi addressing nation via Mann Ki Baat | (Photo Credits: PTI)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज (29 सप्टेंबर) सकाळी 11 वाजता 'मन की बात' (Mann Ki Baat) या कार्यक्रमामधून देशवासियांसोबत संवाद साधला. यावेळी मोदी यांनी आजपासून देशभरात सुरु झालेल्या नवरात्रौत्सवासह अन्य सणांसाठी जनतेला शुभेच्छा दिल्या. तसेच येत्या 2 ऑक्टोंबरला असणाऱ्या महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीला विशेष रुप देण्यासाठी पूर्णपणे प्लास्टिक बंदी करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे.

नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमाच्या सुरुवातीला लता मंगेशकर यांच्या वाढदिवासापूर्वीच आणि विदेशात दौऱ्यावर जाण्याआधी त्यांच्यासोबत फोनवरुन बोलणे झाल्याचे सांगितले. तसेच लतादीदींना त्यांच्या आयुष्यात सर्व सुख शांती लाभो अशी इश्वराकडे प्रार्थना केल्याचे म्हटले आहे.

मन की बात कार्यक्रमात पुढे बोलताना मोदींनी म्हटले की, येत्या सणासुदीच्या काळात प्रत्येक घरात दिवांची आरास दिसून येणार असून पूर्ण जागृकतेने आणि संकल्पनेच्या सहाय्याने देशातील वाईट परिस्थिती बदलणार आहेत. कारण सणाच्या दिवसात काही जणांच्या घरात आनंदाचे वातावरण दिसते तर सुखांपासून दूर राहिलेल्या व्यक्तींना या सर्वाचा आनंद घेता येत नाही. यामुळेच आतापासून प्रत्येक सणाला सर्वत्र रोषणाईच दिसून येणार आहे.

एवढेच नाही तर मोदी यांनी देशातील जनतेला सणाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आजपासून सुरु झालेला नवरात्रौत्सव, दुर्गापूजा, दसरा, दिवाळी, भैया-दूज. छठ पूजा यासारखे सण सुद्धा आनंदाने साजरा करणार असल्याचे मोदी यांनी कार्यक्रमादरम्यान म्हटले. त्यामुळे येणाऱ्या सर्व सणांच्या सर्व नागरिकांना खुप शुभेच्छा मोदींनी दिल्या आहेत.तसेच येत्या 2 ऑक्टोंबर पासून संपूर्ण भारतात प्लास्टिक बंदी करण्यात येणार असल्याचा निर्णय मोदी यांनी जाहीर केला आहे. या दिवशी महात्मा गांधी यांची 150 वी जयंती सुद्धा साजरी करण्यात येणार आहे.(लिक्विडिटीची कोणतीही कमतरता नाही, खासगी बँक प्रतिनिधींसोबतच्या बैठकीनंतर अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची  माहिती)

तर मन की बात कार्यक्रमाच्या शेवटी मोदी यांनी तंबाखूचा मुद्दा उपस्थित करत देशात नागरिकांकडून करण्यात येणाऱ्या विविध नशांपासून दूर राहण्यास आवाहन देण्यात आले आहे. कारण तंबाखूच्या सेवनाने गंभीर आजार व्यक्तीला जडत जाऊन त्याचा मृत्यू होत आहे. तसेच आरोग्यासाठी हानिकारक तंबाखु असल्याने त्यापासून दूर रहा. तसेच काही दिवसांपूर्वीच मोदी सरकारच्या मंडळातील अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी ई-सिगारेटवर बंदी घालण्यात आल्याचा निर्णय दिल्याचा उल्लेख ही मोदी यांनी यावेळी केला आहे.

नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील चौथ्या वेळेस या कार्यक्रमातून देशातील नागरिकांसोबत जोडले जाणार आहेत. आजपासून सुरु झालेल्या नवरात्रौत्सवासह अन्य सण आणि 2 ऑक्टोंबरला असणाऱ्या गांधी जयंती निमित्त आणि स्वच्छ भारत अभियानाबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत,