पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आंध्र प्रदेशात दौऱ्यावर, राज्यात झळकले No More Modi पोस्टर (Photo Credits-ANI)

पंतप्रधान नरेंद्र (Narendra Modi) मोदी यांचा आंध्र प्रदेशात (Andhra Pradesh) रविवारी (10 फेब्रुवारी) दौरा असणार आहे. मात्र दौऱ्यापूर्वी शनिवारी अमरावती येथे मोदी यांच्या विरुद्ध पोस्टर झळकवण्यात आले आहेत. तसेच अद्याप कोणी हे पोस्टर लावले आहेत याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. #NoMoreModi #ModiIsMistake, 'मोदी पुन्हा नको', असे पोस्टरवर लिहिण्यात आले आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू (Chandrababu Naidu) यांनी आज मोदी यांच्या दौऱ्यावेळी कार्यकर्त्यांना गांधीवादी मार्गाने विरोध करण्यास सांगितला आहे.

टेलिकॉन्फ्रेंसच्या माध्यमातून आपल्या पक्षातील नेत्यांसोबत बातचीत करताना नायडू यांनी असे सांगितले की, रविवार हा काळा दिवस असणार आहे. त्यामुळे झालेल्या अन्यायाला न्याय देण्यासाठी मोदी आंध्र प्रदेशात येणार आहेत. तर राफेल प्रकरणात पीएमओ यांच्या हस्तक्षेप राष्ट्रानुसार अपमानकारक आहे. म्हणून आम्ही पिवळ्या आणि काळ्या रंगाचे शर्ट व फुग्यांसोबत शांतिपूर्ण गांधीवादी मार्गाने विरोध करणार आहोत. (हेही वाचा-'चौकीदार चौर है' म्हणणे राहुल गांधी यांना पडले महागात, आता नेटकऱ्यांकडून 'राहुल का बाप चौर है' च्या घोषणा (Video)

चंद्रबाबू नायडू यांच्या सरकारने राज्यात विशेष श्रेणीचा दर्जा लागू करुन द्या अशी मागणी करत आहेत. तर मोदी गुंटुर येथे एका रॅलीला संबोधित करणार आहेत. त्याचसोबत या सभेत मोदी पेट्रोलियम आणि गॅस संबंधित 6,825 करोड रुपांच्या दोन योजनांची घोषणा करणार आहेत.