PM Modi Swearing-in Ceremony 2019: भाजप (BJP) प्रणीत एनडीए (NDA) सरकारच्या शपथविधी सोहळ्यासाठी काऊंटडाऊन सुरु झाले आहे. पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी शपथ घेतल्यावर नवे सरकार स्थापन होईल. या सरकारमधील मंत्रिमंडळामध्ये कोणकोणत्या खासदारांना संधी मिळेल याबात प्रसारमाध्यमांतून जोरदार चर्चा सुरु आहे. दरम्यान, नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह (Amit Shah) यांच्यात संभाव्य मंत्रिमंडळातील खासदारांच्या समावेशाबाबत अंतिम बैठक झाली. या बैठकीत मंत्री म्हणून कोणाकोणाला संधी द्यायची यावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे वृत्त आहे. अखेरच्या बैठकीत मंत्र्यांची नावे निश्चित झाली असून, त्यांची नावेही प्रसारमाध्यमांनी जाहीर केली आहेत. दरम्यान, या नावाबाबत भाजप किंवा एनडीएच्या गोटातून अधिकृतपणे सागण्यात आले नसले तरी, ही नावे जवळपास 99.99 टक्के निश्चित मानली जात आहेत. मोदींच्या मंत्रिमंडळातील संभाव्य मंत्र्यांच्या नावाची यादी इथे पाहा.
मंत्रीपदे निश्चित झालेल्या खासदारांची नावे :
- राजनाथ सिंह (भाजप)
- नितिन गडकरी (भाजप)
- सुषमा स्वराज (भाजप)
- निर्मला सीतारमण (भाजप)
- रविशंकर प्रसाद (भाजप)
- पियुष गोयल (भाजप)
- स्मृती इराणी (भाजप)
- प्रकाश जावडेकर (भाजप)
- किरण रिजिजू (भाजप)
- मुख्तार अब्बास नकवी (भाजप)
- रावसाहेब दानवे (भाजप)
- अरविंद सावंत (शिवसेना)
- रामदास आठवले (भारिप-आठवले गट)
- संजय धोत्रे (भाजप)
- सुरेश अंगाडी (भाजप)
- राव इंद्रजीत (भाजप)
- प्रकाश सिंग बादल (शिअद)
- हरसिमरत कौर (शिअद)
- कैलाश चौधरी (भाजप)
- सदानंद गौडा (भाजप)
- सुरेश प्रभू (भाजप)
- बाबुल सुप्रियो (भाजप)
- अर्जुन राम मेघवाल (भाजप)
- प्रल्हाद जोशी (भाजप)
- संजीव बालियान (भाजप)
- थावरचंद गहलोत (भाजप)
- नित्यानंद राय (भाजप)
- अनुप्रिया पटेल (अपना दल)
- कृष्ण पाल गुर्जर (भाजप)
- आरसीपी सिंह (जेडीयू)
- मनसुख वसावा (भाजप)
- देबाश्री चौधरी (भाजप)
- नरेंद्र सिंह तोमर (भाजप)
- रमेश पोखरियाल निशंक (भाजप)
- पुरुषोत्तम रुपाला (भाजप)
- मनसुख मांडवीय (भाजप)
- डॉ. जितेंद्र सिंह (भाजप)
- कृष्ण रेड्डी (भाजप)
- प्रल्हाद जोशी (भाजप)
- रविंद्रम
- पुरुषोत्तम रुपाला (भाजप)
- रामचंद्र प्रसाद सिंह (JDU)
दरम्यान, भाजपचा सर्वात जुना मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला केवळ एक मंत्रिपद मिळाल्याची चर्चा आहे. तसेच, शिवसेनेला मिळालेल्या एकमेव मंत्रिपदावर अरविंद सावंत यांची वर्णी लागली आहे. तर, NDA 1 मंत्रिमंडळात असलेल्या हरदीप पुरी, के.जे.अल्फोन्सो, मनोज सिन्हा, या मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.