नरेंद्र मोदी 30 मे रोजी संध्याकाळी 7 वाजता पंतप्रधान पदाची शपथ घेणार, राष्ट्रपती भवनात सोहळा पार पडणार
पीएम मोदी | फाइल फोटो | (Photo Credits: Twitter)

नरेंद्र मोदी (Narendra Modi) येत्या 30 मे रोजी संध्याकाळी 7 वाजताच्या सुमारास राष्ट्रपती भवनात (Rashtrapati Bhavan) पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ramnath Kovind) यांच्यासह केंद्रीय मंत्रिपरिषदाच्या अन्य सदस्य सुद्धा त्यांना देण्यात येणाऱ्या पद आणि गोपनीयतेबद्दल शपथ घेणार आहेत. शनिवारी नरेंद्र मोदी यांना एनडीएनच्या पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली. तसेच त्यावेळी पंतप्रधान पदासाठी योग्य त्या दिवसाची वेळ आणि दिनांक ठरवावा यासाठी निर्णय घेण्यात यावा असे सांगितले होते.

भाजप आणि एनडीए कडून मोदी यांना नेतेपदासाठी निवड करण्यात आल्यानंरतर पुन्हा एकदा मोदी सरकारची सत्ता स्थापन करण्यासाठी ते शनिवारी रात्री राष्ट्रपती भवनात गेले होते. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी राष्ट्रपती यांनी त्यांना पंतप्रधान पदासाठी शपथविधी सोहळ्याची वेळ ठरवण्यास सांगितले असल्याचे म्हटले आहे. (दिल्ली: संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये सुरु असलेल्या बैठकीत नरेंद्र मोदी यांची NDA च्या नेतेपदी निवड)

तर सत्तेत आल्यानंतर पुन्हा एकदा जोमाने जनतेसाठी कार्य करत राहणार आहे. तसेच मोदी सरकारकडून पुढील गतवर्षांसाठी जनतेच्या सर्व इच्छा पूर्ण करणार आहे. तर राष्ट्रपती भवनातून जाहीर केलेल्या एका वक्तव्यात राष्ट्रपती यांनी मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान पद दिले आहे असे म्हटले आहे.