पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) उद्या (7 सप्टेंबर) रोजी नागपूर (Nagpur) येथे एकदिवसीय दौऱ्यावर येणार होते. मात्र राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. या पार्श्वभुमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचा नागपूर दौरा रद्द केला आहे. तसेच पुढील 24 तासात अतिवृष्टी होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. मोदी यांनी दौरा रद्द केल्याची अधिक माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
नागपूर येथील मेट्रोसाठी लोकमान्य नगर ते सीताबर्डी पर्यंतच्या 3 टप्प्यातील प्रवासी सेवेचे उद्घाटन मोदी यांच्या हस्ते होणार होते. त्यानंतर संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास मानकापूर क्रीडा संकुलात होणाऱ्या क्रार्यक्रमात मेट्रोसह अन्य प्रकल्पांचे ही उद्घाटन करणार होते.(Maharashtra Monsoon Forecast 2019: मुंबईत पावसाचा जोर ओसरला; मात्र विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता)
मात्र दुपार पासून नागपूर मध्ये पावसाने जोर धरल्यामुळे विविध ठिकाणी पाणी साचले आहे. तसेच नागरिकांची वहाने ही पाण्याखाली गेली आहेत. तसेच आज झालेल्या मुसळधार पावसामुळे नागपूरात ऑरेंज अलर्ट जाहीर केला होता. तर उद्यासाठी रेड अलर्ट जाहीर केला आहे. त्यामुळे उद्या नागपूर मधील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांकडून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.