Monsoon 2019: मुंबईत गेल्या 2 दिवसांपासून धुमाकूळ घातलेल्या पावसाने आज विश्रांती घेतली असून मुंबईच्या काही भागात मध्यम स्वरुपाच्या सरी बरसत आहेत. मुंबईत पावसाचा जोर जरी कमी झाला असला तरी विदर्भात मात्र मुसळधार पावसाची शक्यता स्कायमेटने (Skymet) वर्तविली आहे. तर दुसरीकडे मुंबईसह गोव्यात पावसाचा जोर कमी होऊन हलक्या सरी बरसण्याची शक्यता स्कायमेटने वर्तविली आहे.
2 सप्टेंबरपासून सुरु झालेल्या पावसाने गुरुवारी मध्यरात्रीपासून विश्रांती घेतली अजून ती परिस्थिती आजही पाहायला मिळणार आहे. मुंबईतील अनेक भागांत आज हलक्या सरी बरसण्याची शक्यता स्कायमेटने वर्तविली आहे. तर सध्या गुजरातच्या काही भागामध्ये चक्रवाती परिस्थिती निर्माण झाल्याने त्याचा परिणाम विदर्भात पाहायला मिळणार आहे. शिवाय महाराष्ट्रपासून केरळपासून एक ट्रफ रेषा पाहायला मिळत आहे. ज्याचा परिणाम म्हणून येत्या 24 तासांत विदर्भातील नागपूर (Nagpur), वर्धा (Wardha), यवतमाळ (Yavatmal), अकोला (Akola) या भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. हेही वाचा-Maharashtra Monsoon Forecast 2019: महाराष्ट्र किनारपट्टीवर कमीचा दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे मुंबईसह महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता
स्कायमेटचे ट्विट:
मुंबईत पाऊस कमी होणार, विदर्भात चांगला पाऊस सुरु राहील #MumbaiRains#MumbaiRainsLiveUpdate#MaharashtraRainshttps://t.co/sqsIAJC31k
— Skymet Marathi (@SkymetMarathi) September 5, 2019
महाराष्ट्रातील महाबळेश्वर भागात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तर नाशिक, जळगाव भागात हलक्या ते मध्यम सरी बरसण्याची शक्यता आहे.
मुंबईसह गोव्यात हलका किंवा विखुरलेला पाऊस पाहायला मिळेल तर रत्नागिरीसह कोकणातील ब-याच भागात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता स्कायमेटने वर्तविली आहे.