Monsoon 2019: मागील आठवडाभर दडी मारून बसलेल्या पावसाने अचानक ऐन गणेशोत्सवात (Ganeshotsav) डोकं वर काढल्याने याचा फटका तमाम गणेश भक्तांना आणि तसेच सामान्य नागरिकांना बसलाय. यात बुधवारी पडलेल्या पावसाने तर नागरिकांची अक्षरश: दैनाच झाली. पावसाचा हा जोर आजही कायम राहणार असून येत्या 24 तासांत मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज स्कायमेटने (Skymet) वर्तविला आहे. महाराष्ट्र किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे मुंबईसह महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्याची येत आहे.
2 सप्टेंबरपासून सुरु झालेल्या पावसाने बुधवारी चांगलाच जोर धरला. यामुळे मुंबई (Mumbai), ठाणे (Thane) आणि मुंबई उपनगरांतील रस्त्यांवर तसेच रेल्वे रुळांवर पाणी साचले. यामुळे रेल्वे वाहतूक ठप्प झाली तर रस्ते वाहतुकीवरही याचा परिणाम झाला. आज सकाळपासून जरी पावसाने विश्रांती घेतली असली तरीही पुढील 2 दिवस मुंबईत मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता स्कायमेटने वर्तवली आहे.
स्कायमेट चे ट्विट:
हवामान अंदाज 5 सप्टेंबर: मुंबईत मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता#maharashtrarains#MumbaiRainsLiveUpdates#weatherhttps://t.co/BzBPrfMJBa
— Skymet Marathi (@SkymetMarathi) September 4, 2019
दक्षिण गुजरात ते केरळपर्यंत मान्सूनची सक्रिय ट्रफ विस्तारल्याने महाराष्ट्र किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे पुढील 2 दिवस मुंबईसह महाराष्ट्रात ब-याच ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
4 सप्टेंबरला उद्भवलेली स्थिती पुन्हा ओढवू नये म्हणून महाराष्ट्र सरकारने शाळा आणि जुनिअर कॉलेजला आज सुट्टी जाहीर केली आहे. महाराष्ट्र शिक्षणमंत्री आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी याबाबत माहिती दिली.