महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 निकाल: धनंजय मुंडे, अजित पवार, राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह पहा 288 विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी

महाराष्ट्रात 21 ऑक्टोबर रोजी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीचा (Maharashtra Assembly Election 2019) निकाल लागायला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रात (Maharashtra) कोणत्या पक्षाचा झेंडा फडकणार आणि कोणाची सत्ता येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. विधानसभा निवडणुकाचे चित्र आता स्पष्ट होत चालले आहे. हाती आलेल्या कलांनुसार भाजपाचे स्वबळाचे स्वप्न भंगले आहे. भाजपाला जरी सर्वाधिक जागा मिळाल्या असल्या तरी त्यांना स्वबळावर सत्ता मिळवता येणार नसल्याचे स्पष्ट होत आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 मधील विजयी उमेदवार-

विधानसभा निवडणूक 2019 चे Live Updates पाहण्यासाठी येथे क्लिक करा

भारतीय जनता पक्षाने गेल्या विधानसभा निवडणुकीत 122 जागा मिळवल्या होत्या. मात्र, या निवडणुकीत भाजप केवळ 100 जागांवर आघाडी घेतली आहे.सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात एक वेगळी परिस्थिती निर्माण झाली आहे. मागील लोकसभा निवडणुकीत भाजपने एक हाती विजय मिळवला होता.  या निवडणुकीत भाजपकडून प्रचार दरम्यान 'अब की बार 220 पार' अशी घोषणा देण्यात आली होती. एकेकाळी भाजपच गेल्या विधानसभा निवडणुकी पेक्षा मोठा धमका करेल अशी अपेक्षा करण्यात आली होती. परंतु, प्रत्यक्षात काही वेगळाच निकाल लागल्याचे समोर आले आहे.