राहुल गांधी (छायाचित्र सौजन्य: inc.in)

Lok Sabha Elections 2019: आगामी लोकसभा निवडणुक अवघ्या काही दिवसांवर आल्या आहेत. याच पार्श्वभुमीवर रविवारी (31 मार्च) काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) आगामी लोकसभा निवडणुकीसाठी दोन मतदारसंघातून निवडणुक लढवणार असल्याचे पक्षाकडून अधिकृतपणे जाहीर करण्यात आले आहे.

राहुल गांधी दोन मतदार संघातून निवडणुक लढवणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तर अमेठीसह (Amethi) दक्षिण भारतातील केरळ (Kerala) येथील वायनाड (Wayanad) मतदार संघातून निवडणुक लढवणार आहेत. यापूर्वी केरळ प्रदेशाध्यक्ष मुल्लापल्ली रामचंद्रन यांनी ही माहिती दिली होती. परंतु आज पक्षाकडून अधिकृतपणे घोषणा करण्यात आली आहे. (हेही वाचा-Lok Sabha Elections 2019: राहुल गांधी करणार दुहेरी उमेदवारी; उत्तर प्रदेश राज्यातील अमेठीसह केरळमधील वायनाड येथून लढणार निवडणूक)

ANI ट्वीट:

कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळ आदी राज्यांतील नेत्यांकडून काँग्रेस नेतृत्वावर गेल्या काही दिवसांपासून दबाव होता. त्यामुळे उत्तर प्रदेश राज्यातील अमेठी लोकसभा मतदारसंघातून बाहेर पडत दक्षिणेकडील कोणत्याही राज्यातून लोकसभा निवडणूक लढवावी असे सुद्धा सांगण्यात आले होते.अमे