Loksabha Elections 2019: राहुल गांधी करणार दुहेरी उमेदवारी; उत्तर प्रदेश राज्यातील अमेठीसह केरळमधील वायनाड येथून लढणार निवडणूक
राहुल गांधी (Photo Credits: PTI)

Loksabha Elections 2019: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) या वेळी लोकसभा निवडणूक 2019 ला सामोरे जाताना दोन लोकसभा मतदारसंघातून निवडणुक लढवणार आहेत. काँग्रेस पक्ष (Congress Party) केरळ (Kerala) प्रदेशाध्यक्ष मुल्लापल्ली रामचंद्रन (Mullappally Ramachandran) यांनी ही माहिती दिली. रामचंद्रन यांनी सांगितले की, राहुल गांधी हे केरळ येथील काँग्रेसचा गड समजल्या जाणारा वायनाड लोकसभा मतदारसंघ (Wayanad Lok Sabha constituency) निवडणार आहेत. या आधी राहुल गांधी लोकसभा निवडणुकीसाठी उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) राज्यातील आपला पारंपरिक अमेठी लोकसभा मतदारसंघ (Amethi Lok Sabha constituency ) निवडत असत. या वेळी राहुल गांधी यांनी प्रथमच दुहेरी मतदारसंगातून निवडणुक लढविण्याची तयारी केली आहे. केरल राज्यातून निवडणूक लढविण्यासाठी राहुल गांधी तयार असल्याचेही मुल्लापल्ली रामचंद्रन यांनी सांगितले.

काँग्रेस नेतृत्वावर गेल्या काही दिवसांपासून दबाव

कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळ आदी राज्यांतील नेत्यांकडून काँग्रेस नेतृत्वावर गेल्या काही दिवसांपासून दबाव होता की, त्यांनी उत्तर प्रदेश राज्यातील अमेठी लोकसभा मतदारसंघातून बाहेर पडत दक्षिणेकडील कोणत्याही राज्यातून लोकसभा निवडणूक लढवावी. दरम्यान, मुल्लापल्ली रामचंद्रन यांनी बोलताना सांगितले की, गेले एक महिनाय या विषयावर काँग्रेसमध्ये चर्चा सुरु होती. सुरुवातीला या निर्णयाला राहुल गांधी फारसे अनुकुल नव्हते. परंतू, सर्वच नेत्यांच्या विनंतीला मान देऊन ते तयार झाले. लोकसभा मतदारसंघाती पुनर्रचना झाल्यानंतर 2008 मध्ये वायनाड लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आला. हा मतदारसंघ कन्नूर, मल्लापूरम आणि वायनाड मतदारसंघातील काही भाग एकत्र करुन तयार करण्यात आला आहे. या मतदारसंघातून काँग्रेस नेते एम एल शाहनावाज यांनी सलग दोन वेळा विजय प्रस्तापीत केला आहे. (हेही वाचा, Loksabha Elections 2019 : लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची तिसरी यादी जाहीर; महाराष्ट्रातील चंद्रपूर, जालना, औरंगाबाद, लातूर मतदारसंघ उमेदवारांचा समावेश)

'तर, ती माझ्यासाठी आणि माझ्या राज्यासाठी अत्यंत सन्मानाची गोष्ट'

माजी युवा काँग्रेस अध्यक्ष टी. सिद्दिकी यांचे नाव या मतदारसंघातून चर्चेत होते. मात्र, ही चर्चा पुढे सरकण्यापूर्वीच त्यांनी मैदानातून बाहेर पडत तलवार म्यान केली. कोझिकोड येथून आपल्या उमेदवारी माघारीची घोषणा करताना त्यांनी सांगितले की, राहुल गांधी या मतदारसंघातून निवडणूक लढवत असतील तर, ती माझ्यासाठी आणि माझ्या राज्यासाठी अत्यंत सन्मानाची गोष्ट आहे.