congress | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

Loksabha Elections 2019: राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत महाराष्ट्रातील 4 उमेदवारांचा समावेश आहे. चंद्रपूर (Chandrapur Lok Sabha constituency) , जालना (Jalna Lok Sabha constituency) , औरंगाबाद (Aurangabad Lok Sabha constituency) , लातूर लोकसभा मतदारसंघातून (Latur Lok Sabha constituency) अनुक्रमे विनायक बंगाडे, विलास औताडे, सुभाष झांबड, सुरेश टावरे आणि मच्छिंद्र कामनात यांना महाराष्ट्रातून काँग्रेसची उमेदवारी मिळाली आहे.

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ हा तसा लक्षवेधी मतदारसंघ. या मतदारसंघातून भाजपचे हंसराज अहिर निवडूकीच्या रिंगणात आहे. केंद्रात त्यांना मंत्रिपद मिळाल्याने भाजपसाठी हा मतदारसंघ वजनदार आहे. मात्र, विनायक बंगाडे यांच्यारुपात तगडा उमेदवार देऊन काँग्रेसने हंसराज अहिर यांच्यासमोर आव्हान निर्माण केले आहेत. (हेही वाचा, Lok Sabha Election 2019: शिवसेना पक्षाच्या पहिल्या उमेदवार यादीमध्ये ओमराजे निंबाळकर, हेमंत पाटील या दोन नव्या चेहर्‍यांना संधी; पहा कोणाचं तिकीट कापलं)

लोकसभा निवडणूक 2019: काँग्रेस उमेदवार तिसरी यादी

अ.क्र. लोकसभा मतदारसंघ उमेदवाराचे नाव
1. नंदुरबार के. सी. पडवी
2. धुळे कुणाल रोहिदास पाटील
3. वर्धा चारुलता टोकस
4. मुंबई दक्षिण मध्य एकनाथ गायकवाड
5. यवतमाळ-वाशिम - माणिकराव ठाकरे
6. शिर्डी- भाऊसाहेब कांबळे
7. रत्नागिरी-सिंधुदुर्ग नवीनचंद्र बांदिवडेकर
8. नागपूर - नाना पटोले
9. सोलापूर सुशीलकुमार शिंदे
10. मुंबई उत्तर-मध्य प्रिया दत्त
11. मुंबई दक्षिण मिलिंद देवरा
12. गडचिरोली-चिमूर डॉ. नामदेव उसेंडी
13. चंद्रपूर विनायक बंगाडे
14. जालना विलास औताडे
15. औरंगाबाद सुभाष झांबड
16. भिवंडी सुरेश टावरे
17. लातूर मच्छिंद्र कामनात

लोकसभा निवडणूक 2019 काँग्रेस  उमेदवार दुसरी यादी

नंदुरबार - के. सी. पडवी

धुळे - कुणाल रोहिदास पाटील

वर्धा - चारुलता टोकस

मुंबई दक्षिण मध्य - एकनाथ गायकवाड

यवतमाळ-वाशिम - माणिकराव ठाकर

शिर्डी- भाऊसाहेब कांबळे

रत्नागिरी-सिंधुदुर्ग - नवीनचंद्र बांदिवडेकर

नागपूर - नाना पटोले

सोलापूर - सुशीलकुमार शिंदे

मुंबई उत्तर-मध्य - प्रिया दत्त

मुंबई दक्षिण - मिलिंद देवरा

गडचिरोली-चिमूर - डॉ. नामदेव उसेंडी

चंद्रपूर- विनायक बंगाडे

जालना- विलास औताडे

औरंगाबाद- सुभाष झांबड

भिवंडी - सुरेश टावरे

लातूर- मच्छिंद्र कामनात

लोकसभा निवडणूक 2019 काँग्रेस उमेदवार पहिली यादी

नंदुरबार - के. सी. पडवी

धुळे - कुणाल रोहिदास पाटील

वर्धा - चारुलता टोकस

मुंबई दक्षिण मध्य - एकनाथ गायकवाड

यवतमाळ-वाशिम - माणिकराव ठाकरे

शिर्डी- भाऊसाहेब कांबळे

रत्नागिरी-सिंधुदुर्ग - नवीनचंद्र बांदिवडेकर

दरम्यान, राज्यातील बहुतांश मतदारसंघातून काँग्रेसने लोकसभेसाठी उमदेवार दिले आहेत .मात्र, पुण्याचा तिढा मात्र काँग्रेसला अद्याप सोडवता आला नाही. पुण्यातून विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांचा पत्ता कट करत राज्य सरकारमध्ये मंत्री असलेल्या गिरीष बाबट यांना भाजपने पुण्यातून रिंगणात उतरवले आहे. त्यामुळे बापट यांच्या विरोधात तगडा उमेदवार कोण द्यावा? यावर काँग्रेसच्या गोटात खल सुरु असल्याचे समजते. तसेच, औरंगाबादच्या जागेची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. मात्र, आघाडीत औरंगाबादची जागा काँग्रेसने राष्ट्रवादीला अद्याप दिली नाही. त्यामुळे जागेच्या बदल्यात होणारी अदलाबदलही अद्याप झाली नाही. त्यामुळे पुण्याच्या जागेबाबत अद्याप तरी उत्सुकताच आहे.