Rahul Gandhi and Narendra Modi address press conferences simultaneously (Photo Credits: ANI)

आज (17 मे) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी गेल्या पाच वर्षात पहिल्यांदाच पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. तर दुसऱ्या बाजूला काँग्रेस (Congress) अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी सुद्धा पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी यांच्यावर निशाणा साधत टीका केली आहे. तसेच मोदी यांच्या पत्रकार परिषदेसाठी मागचे दरवाजे बंद करण्यात आले असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत लगावला आहे.

येत्या 23 मे रोजी जनतेचा कौल कोणाकडे आहे हे कळेलच. त्यावरुन पुढील कामे करण्यात येतील असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.तत्पूर्वी मी काही बोलणार नसून जनतेच्या मताचा आदर आम्ही करतो असे सांगितले आहे. परंतु निवडणूक आयोगाची भुमिका ही नेहमीच पक्षपाती राहिली असल्याची टीकासुद्धा करण्यात आली आहे.(Lok Sabha Elections 2019: 'पाच वर्षात सरकारने भरीव काम केले', सत्ताकाळातील अखेरच्या क्षणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पहिलीच पत्रकार परिषद)

तर मोदी यांच्या प्रचारसभांचे वेळापत्रक पाहून निवडणूकींच्या तारखा ठरवण्यात आल्याचा आरोप सुद्धा राहुल गांधी यांनी यावेळी केला आहे. मोदी यांच्याकडे बक्कळ पैसा असला तरीही आमच्याकडे त्याबद्दलचे सत्य आहे.

तसेच मोदी यांनी पत्रकार परिषदेत राफेल करारवर बोलावे असे राहुल गांधी यांनी सवाल उपस्थित केला. या सोबतच मोदी यांनी माझ्या आई-वडिलांवर नको ते आरोप लगावले आहेत. मात्र मोदी यांना त्यांच्याबद्दल हवे ते बोलून दे असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.