Lok Sabha Elections 2019:  'पाच वर्षात सरकारने भरीव काम केले', सत्ताकाळातील अखेरच्या क्षणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पहिलीच पत्रकार परिषद
Prime Minister Narendra Modi press conference | (Photo Credits: ANI)

Lok Sabha Elections 2019: राजधानी दिल्ली आणि देशातील राजकारणात आजची (शुक्रवार, 17 एप्रिल 2019) सायंकाळ काही ऐतिहासिक क्षण घेऊन आली. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह ( BJP President, Amit Shah) यांनी राजधानी दिल्ली येथे पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेस पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi)  उपस्थित होते. या पत्रकार परिषदेचे वैशिष्ट्य असे की,या पत्रकार परिषदेस पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. पंतप्रधानांचे मोदी यांचे एखाद्या पत्रकार परिषदेस (Prime Minister Narendra Modi press conference) उपस्थित असण्याची ही पहिलीच वेळ होती. पाच वर्षात भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारने भरीव काम केल्याचे पंतप्रधान मोदी यांनी या वेळी सांगितले.

एएनआय ट्विट

पत्रकार परिषदेची सुरुवात भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी केली. या वेळी बोलताना अमित शाह म्हणाले,  भाजप एक संघटनात्मक पातळीवर काम करणारी पक्ष. सर्व पातळ्यांवर भाजप संघटनात्मक पद्धतीनेच काम करतो. 2014 मध्ये जनतेने भाजपवर विश्वास दाखवला. त्यानंतर गेल्या पाच वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने चांगले काम केले. भाजपने पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली 133 योजना आणल्या. शेतकरी, दलित, पर्यावरण अशा अनेक पातळ्यांवर सरकारने विविध योजना आणल्या, असेही अमित शाह यांनी सांगितले.

पंतप्रधानांची मुलाखत इथे पाहा लाईव्ह

काय म्हणाले नरेंद्र मोदी?

पत्रकार परिषदेत बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले,  पाच वर्षात आम्ही चांगलं काम केलं. लोकसभा निवडणूक काळातही मी प्रचार नव्हे तर, लोकांना शुभेच्छा देण्यासाठी जात होतो.  सत्ताकाळात आम्ही जगाला प्रभावीत करतील अशा अनेक गोष्टी केल्या. प्रत्येक वेळी, प्रत्येक निर्णय घेताना देश सोबत राहिला. 17 मे रोजी भाजप सत्तेवर आले तेव्हा देशातील सत्ताखोरीला पहिल्यांदा हादरा बसला., असेही पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.