पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकरणातील गोलंदाजीमुळे विरोधी पक्षांची दांडी गुल, भाजपचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल (Video)
BJP Video (Photo Credits-Twitter/Edited)

देशात सध्या लोकसभा निवडणूक (Lok Sabha Elections) आणि आयपीएलची (IPL) रणधूमाळी दिसून येत आहे. याच पार्श्वभुमीवर आता भाजप (BJP) पक्षाने एक 25 सेकंदाचा व्हिडिओ ट्वीटरवरुन पोस्ट केला असून त्यामध्ये विरोधकांवर टीका करण्यात आली आहे. तर पोस्टला 'विपक्ष की निकली हवा इस बार... फिर एक बार मोदी सरकार' असे कॅप्शन देण्यात आले आहे.

भाजपने पोस्ट केलेल्या व्हिडिओत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) गोलंदाजी करताना दिसून येत आहेत. तर विरोधी पक्ष फलंदाजीसाठी पुढे सरसावताना घाबरत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मोदी यांच्या राजकरणातील गोलंदाजीमुळे विरोधी पक्ष नेते घाबरत एकमेकांना मोदींसमोर पुढे फलंदाजीसाठी ढकलत आहेत.(Lok Sabha Election 2019: निवडणूकीच्या निकालावर 12,000 करोड रुपयांचा सट्टा, जाणून घ्या निवडणूकीच्या रणधुमाळीतील सट्टा बाजाराचे स्वरुप)

तसेच या व्हिडिओत शरद पवार, अरविंद केजरीवाल, प्रियांका गांधी, राहुल गांधी आणि मायावती यांना फलंदाजी करत असलेल्या रुपात दाखविले आहे. तर मोदी निवांत एका खुर्चीवर बसले असून त्यांच्यासमोर कोणीही खेळी करण्यास तयार नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आता विरोधकांकडून या व्हिडिओवर काय प्रतिउत्तर दिले जाईल हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.