नरेंंद्र मोदी (फोटो सौजन्य-PTI)

लोकसभा निवडणूक 2019(Lok Sabha Election 2019)  पाचव्या चरणातील 425 जागांसाठी मतदान संपन्न झाले आहे. आता केवळ शेवटच्या 2 टप्प्यांतील 118 जागांसाठी मतदान बाकी आहे. यंदाची निवडणूकीत मोदी सरकारचे पुन्हा एकदा कमबॅक होणार की कोणते नवीन सरकार येणार, हे येणा-या 23 मे ला स्पष्ट होईल. मात्र ह्या महत्त्वाच्या निकालासाठी सट्टाबाजार तेजीत असून 12,000 करोड रुपयांचा सट्टा लागला आहे.

सट्टा बाजारात सुरु असलेल्या चर्चांनुसार, यंदा कोणत्याही पार्टीला बहूमत मिळणार नाही. मात्र प्रमुख दोन पक्षांमध्ये कांटे की टक्कर पाहायला मिळणार आहे. भारतीय जनता पार्टीचे नेतृत्व असलेली एनडीए सरकार (NDA Govt) वर 11 रुपये, तर यूपीए सरकारवर (UPA Govt) वर 33 रुपयांचा भाव सट्टा बाजारात सुरु आहे.

सट्टा बाजारानुसार भारतीय जनता पार्टी (BJP) नेतृत्व असलेले NDA 185 वरुन 220 जागा मिळवू शकतात. तर यूपीए सरकार (United Progressive Alliance) 160-180 जागेवर विजय मिळवू शकतात. सट्टा बाजारात बीजेपी (BJP) चा भाव 2 रुपये आहे तर काँग्रेसचा भाव 1.5 रुपया आहे. ह्या निवडणुकीत ‘एयर स्ट्राइक’ चा जास्त फायदा होणार नाही.

नरेंद्र मोदी (Narendra Modi) पुन्हा सत्तेत येण्यावरच अधिक सट्टेबाजी होत असल्याचे दिसत आहे. मात्र सट्टा बाजाराचे (Satta Bazar)  म्हणणे आहे की, 2014 च्या तुलनेत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)  यांचा प्रभाव थोडा कमी झाला आहे.

Loksabha Elections 2019: मी सुप्रीम कोर्टाची माफी मागितली, मोदींची नाही, 'चौकीदार चोर है' हे विधान योग्यच : राहुल गांधी

सट्टा बाजारातील ट्रेंडचा विचार केला असता, यंदा एनडीए (NDA) आणि यूपीए (UPA) च्या तुलनेत थर्ड फ्रंट (महागठबंधन) ला चांगल्या जागा मिळतील. महागठबंधनच्या दलांना 220-250  इतक्या जागा मिळण्याचा अनुमान सट्टेबाजारातील प्रमुखांना लावला आहे. दोन्ही मोठ्या गठबंधनच्या तुलनेत ‘महागठबंधन’ ला निर्णायक जागा मिळण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. तरी इथे एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की, अजून 2 टप्प्यांतील मतदान बाकी असल्यामुळे कदाचित हा आकडा बदलू शकतो ही शक्यता नाकारता येत नाही.