INX Media Case: माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांना सीबीआयकडून अटक
पी. चिदंबरम यांना अटक (Photo Credits-ANI)

सीबीआयच्या (CBI) पथकाने माजी अर्थमंत्री पी चिदंबरम (P Chidambaram)  यांना अटक केली आहे. तर चिदंबरदम यांना त्यांच्याच घरातून सीबीआयने अटक केल्याचे वृत्त समोर येत आहे. आयएनएक्स मीडिया (INX Media) प्रकरणी त्यांची चौकशी करण्यासाठी चिदंबरम यांना ताब्यात घेतले आहे. अटक केल्यानंतर त्यांना सीबीआयच्या मुख्यालयात आणण्यात येणार आहे. मात्र चिदंबरम यांच्या घराबाहेर प्रदर्शन करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच काँग्रेस कार्यकर्ते सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करताना दिसून येत आहेत. तर चिदंबरम यांना उद्या (22 ऑगस्ट) सीबीआयच्या विशेष कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

चिदंबरम यांना अटक करण्यापूर्वी त्यांनी काँग्रेस कार्यालयात एका पत्रकार परिषदेचे आयोजन करत माझ्या विरोधात खोटा आरोप लगावला जात असल्याचे म्हटले आहे. INX मीडियाच्या प्रकरणात माझ्या विरोधात प्रचार केला जात असल्याचे ही चिदंबरम यांनी म्हटले आहे. मला आणि माझ्या मुलाला फसवले गेले असल्याचे ही त्यांना सांगितले आहे. तसेच या प्रकरणी कोणतीही तक्रार किंवा घरातील सदस्यांच्या विरोधात कोणताही आरोप नसल्याचे ही चिदंबरम यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे.(INX Media Case:माझ्यावर कोणतेही आरोप नाहीत, गेले 27 तास वकिलांसोबत कायदेशीर बाजू समजून घेत होतो: पी चिदंबरम)

ANI ट्वीट: 

तसेच माझ्यावर या प्रकरणी लपून राहत असल्याचा आरोप लगावला असल्याची खंत व्यक्त केली आहे. त्याचसोबत INX Media प्रकरणी चिदंबरम यांनी  आपली बाजू प्रसारमाध्यमांसमोर मांडली. भाजप पक्षाच्या सांगण्यावरुन ही कारवाई केल्याचा आरोप किर्ती चिदंबरम यांनी केला आहे. तर पी चिदंबरम यांना न्यायालयाने दिलासा न देता त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता. गेले 27 तास पी चिदंबरम हे बेपत्ता होते. त्यानंतर 27 तासानंतर चिदंबरम हे अचानक काँग्रेस कार्यालयात उपस्थित झाले होते.