दिल्ली हिंसाचार: केजरीवाल सरकार मृतांच्या परिवाराला 10 लाख रुपये तर जखमींना मोफत उपचार देणार
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Photo Credits-ANI)

नॉर्थ इस्ट दिल्लीत (North-East Delhi) गेल्या काही दिवसांपासून नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या (CAA) विरोधातील आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जात असून पूर्वस्थितीत हळू हळू आवाक्यात येत आहे. तर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी गुरुवारी यासंबंधित एक उच्चस्तरीय बैठक बोलावली होती. त्यामध्ये हिंसाचार झालेल्या भागात मदत साहित्य पुरविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केजरीवाल यांनी संध्याकाळी पत्रकार परिषद घेत असे म्हटले की, पीडित परिवाराला मदत म्हणून दिल्ली सरकारकडून दिलासा देण्यासाठी योजना बनवली आहे. त्यानुसार दिल्ली सरकार हिंसेत मृत्यू झालेल्या नागरिकांच्या परिवाराला 10 लाख रुपये आणि जखमींना 2 लाख रुपये देणार असल्याचा स्पष्ट केले आहे.

दिल्ली हिंसाचारात जखमी किंवा मृतांच्या परिवाराल दिलासा देण्यासाठी काही पावले उचलली आहेत. जे लोक जखमी झाले आहेत त्यांच्यावर उपचार सुरु आहे. मात्र जे खासगी रुग्णालयात उपचार करणार असल्यास त्यांनी फरिश्ते स्कीम अंतर्गत योजनेचा फायदा घेऊ शकणार आहे.तसेच केजरीवाल यांनी असे ही म्हटले आहे की, ज्या व्यक्ती यामध्ये आरोपी आहे त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी. जर आम आदमी पार्टीचा कोणताही व्यक्ती दोषी असेल तर त्याला दुप्पट शिक्षा दिली जाणार आहे.(Delhi Violence: अरविंद केजरीवाल यांची हिंसाचाराच्या घटनास्थळी जमावबंदी, लष्काराला बोलवण्याची मागणी)

यापूर्वी अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी उत्तर-पूर्व दिल्लीतील हिंसा झालेल्या ठिकाणी घटनास्थळी जात स्थानिकांची भेट घेतली होती. त्यावेळी उपमुख्यंत्री मनीष सिसोदीया सुद्धा केजरीवाल यांच्यासोबत उपस्थित होते. दिल्ली हिंसाचारात आतापर्यंत 35 जणांचा मृत्यू झाला असून जवळजवळ 200 जण जखमी झाले आहेत.