अरविंद केजरीवाल (Photo Credits- PTI)

राजधानी दिल्लीत नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या (CAA) विरोधात जोरदार आंदोलन करण्यात येत आहे. तर आंदोलनाला हिंसेचे वळण लागले असून त्यामध्ये आतापर्यंत 20 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. आज सकाळी गोकुलपुरी परिसरात हिंसक वळण लागल्याची बाब समोर आली आहे. याच दरम्यान काही आंदोलकांनी एका दुकानाला पेटवले. याच पार्श्वभुमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यांनी ट्वीट करत असे म्हटले आहे की, कितीही प्रयत्न करुन सुद्धा पोलिसांकडून आंदोलनाची परिस्थिती कंट्रोल करु शकत नाही आहे. त्यामुळेच तत्काळ जमावबंदी आणि लष्कराला बोलवावे अशी मागणी केली आहे.

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गृहमंत्र्यांना याबाबत सांगितले आहे, तर दिल्लीत हिंसेमुळे हायकोर्टात बुधावारी सकाळी सुनावणी झाली. या याचिकेनुसार वातावरण संतप्त करणारे भाषण देणाऱ्या नेत्यांच्या विरोधात गुन्हेगार असल्याचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली होती. दिल्ली कोर्टाने पोलिसांना आतापर्यंत काय कारवाई केली याचे स्पष्टीकरण देण्यास सांगितले आहे.(CAA Protest: दिल्ली पोलिसांनी जखमी आंदोलकांना मारहाण करत गायला लावलं राष्ट्रगीत Watch Video)

दुसऱ्या बाजूला परिस्थिती पाहता दिल्ली हायकोर्टाने पोलिसांना एक नोटिस जाहीर केली आहे. त्यानुसार हिंसेसंबंधित याचिकेवरील सुनावणीवेळी वरिष्ठ अधिकारी सुद्धा उपस्थित होते. यापूर्वी अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत परिस्थिती लवकरात लवकर पूर्ववत व्हावी यासाठी राजघाटावर प्रार्थना केली होती. या कठीण प्रसंगी महात्मा गांधीजींचा आदर्श समोर ठेवावा. कारण हिंसा करुन काहीच हाती येणार नसल्याचे ही म्हटले आहे.