नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून (CAA) ईशान्य दिल्ली मध्ये आज सलग तिसऱ्या दिवशीही अमानुष हिंसाचार सुरु आहे. या हिंसाचारामध्ये तब्बल 7 जणांचा मृत्यू झाला आहे तर काल मंगळवारी झालेल्या दगडफेक व गोळीबारात एका पोलीस हेड कॉन्स्टेबलचा सुद्धा मृत्यू झाल्याचे समजतेय. एकीकडे दिल्ली मध्ये हे वातावरण पेटलेले असताना सोशल मीडियावर सुद्धा सीएए समर्थक व विरोधकांमध्ये ट्विट वॉर सुरु आहे, याच पार्श्वभूमीवर सकाळपासून #NationalAnthem हा हॅशटॅग ट्रेंड होत होता, या हॅशटॅगचा वापर करून दिल्ली आपचे प्रवक्ते सुधीर यादव (Sudhir Yadav) यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे, यामध्ये आंदोलनकर्त्या जखमी आंदोलकांना दिल्ली पोलिसांकडून अमानुषपणे मारहाण करण्यात येत असल्याचे दिसत आहे, याशिवाय मारहाण करतानाच या आंदोलकांना जबरदस्ती राष्ट्रगीत (National Anthem) म्हणायला लावले जात आहे.CAA Protest: नोर्थ ईस्ट दिल्ली मध्ये कलम 144 लागू; पुढील महिन्याभरासाठी जमावबंदी लागू
सुधीर यांनी एक व्हायरल व्हिडिओ शेअर करताना ट्विट करत दिल्ली पोलिसांवर निशाणा साधला आहे. “राष्ट्रगीत यापुढे आधीसारखे वाटणार नाही,” अशी कॅप्शन यादव यांनी व्हिडिओला दिली आहे. त्यांनी दिल्ली पोलिसांना लाज वाटली पाहिजे असंही या ट्विटमध्ये म्हटलं आहे. यादव यांनी अमित शाह यांनी राजीनामा द्यावा अशा आशयाचा हॅशटॅगही ट्विटमध्ये वापरला आहे.यादव यांनी ट्विट केलेल्या व्हिडिओमध्ये काही युवक जखमी अवस्थेत रस्त्याच्या कडेला पडलेले दिसत आहे. या युवकांना दिल्ली पोलिसांचे जवान राष्ट्रगीत गाण्यास सांगत असल्याचा आरोप यादव यांनी केला आहे.
सुधीर यादव ट्विट
National Anthem will never be the same ever again. @DelhiPolice SHAME ON YOU!!
#DelhiRiots #AmitShahMustResign pic.twitter.com/iX7pq5QT8P
— Sudhir Yadav (@SudhirRTI) February 25, 2020
दरम्यान, या व्हिडिओसंदर्भात दिल्ली पोलिसांनी कोणतेही स्पष्टीकरण दिलेलं नाही. या व्हिडिओतील तरुण कोण आहेत?याबाबतही माहिती समोर आलेली नाही. दरम्यान हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची बैठक झाली आहे काल केजरीवाल यांनी या घटनांच्या पार्श्वभूमीवर सैन्याला मदतीसाठी उतरवण्यात यावे अशी विनंती केंद्र सरकारला केली आहे.