CAA वरुन दिल्ली मधील हिंसाचाराला काँग्रेस-APP जबाबदार- केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर
File image of Union HRD Minister Prakash Javadekar (Photo Credits: PTI)

देशभरात नागरिकत्व सुधारणा कायद्यावरुन (Citizenship Amendment Act) जोरदार आंदोलन करण्यात आले. मात्र या आंदोलनाला एक हिंसचाराचे वळण लागल्याचे चित्र दिसून आले. तसेच सीएएला विरोध करण्याचे आरोप-प्रत्यारोप सुरु सुद्धा झाले. याच पार्श्वभुमीवर भाजपचे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिल्लीतील हिंसाचाराला काँग्रेस आणि आप पार्टी जबाबदार असल्याचे म्हटले आहे. एवढेच नाही तर यांनी देशाची माफी मागावी अशी सुद्धा मागणी केली आहे.

प्रकाश जावडेकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना असे म्हटले आहे की, दिल्लीतील हिंसाचाराला आप आणि काँग्रेस पक्ष जबाबदार असून याच्याविरोधात एकही शब्द बोलण्यास तयार नाही. तर आप आण काँग्रेस पक्षाचे लोक हिंसाचार करण्यास भाग पाडत आहे. भाजप नेत्यांनी असे म्हटले आहे की, दिल्लीतील जामिया मध्ये काँग्रेसचे आसिफ खान आणि आम आदमी पार्टीचे आमदार अमानतुल्ला यांच्यावर लोकांना हिंसाचार करण्यास भाग पाडल्याचा आरोप लावण्यात आला आहे. त्यामुळेच त्यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्या प्रकरणी करण्यात आलेल्या हिंसाचाराबाबत माफी मागावी असे म्हटले आहे.(दिल्लीनंतर अलीगढ़ मुस्लिम विद्यापीठात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात आंदोलन; AMU 5 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय)

ANI Tweet:

तर काही दिवसांपूर्वी  नागरिकत्व सुधारित कायद्याच्या  निषेधार्थ अलीगढ़ मुस्लिम विद्यापीठात, 15 डिसेंबर रोजी झालेल्या हिंसाचाराबाबत उत्तर प्रदेश पोलिसांनी मोठी कारवाई केली. या प्रकरणी पोलिसांनी विद्यापीठाच्या एक हजार अज्ञात विद्यार्थ्यांविरूद्ध हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला आहे.अलीगढ़ विद्यापीठात झालेल्या हिंसाचारादरम्यान तीन विद्यार्थी जखमी झाले. पोलिसांनी या प्रकरणात 3 विद्यार्थ्यांना अटक केली होती. निर्माण झालेली गंभीर परिस्थितीत पाहता प्रशासनाने एएमयू 5 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता.