Nitin Gadkari | (Photo Credit-PTI)

चीन येथील वुहान शहरातून लागण झालेल्या कोरोना व्हायरसचे जगभरात थैमान घातले आहे. अमेरिका सातत्याने म्हणत आहे की, कोरोना व्हायरस हा नैसर्गिक नसून तो वुहान शहरातील लॅब मध्ये बनवण्यात आला आहे. त्यानंतर आता केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी सुद्धा कोरोना व्हायरस हा लॅब मधून निघाला असून त्याचा प्रादुर्भाव सर्वत्र परसल्याचा दावा केला आहे. तर कोरोनासोबत आता जगणे शिकायला हवे असे ही गडकरी यांनी एका चॅनलसोबत बोलताना स्पष्ट केले आहे. गडकरी यांनी पुढे असे ही म्हटले आहे की, जेवढे मला माहिती आहे जर कोरोना व्हायरस नैसर्गिक असता तर आतापर्यंत वैज्ञानिकांना याबाबत कळले असते. कोरोना हा लॅबमध्ये तयार झालेला विषाणू आहे. अमेरिका सुद्धा कोरोना लॅब मध्ये तयार झाल्याचे सांगत आहे. अमेरिका राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर कोरोना व्हायरस तयार केल्याचा आरोप ही लावला आहे.

कोरोना व्हायरस सोबत आता आपण जगणे शिकायला हवे. कोरोना हा आर्टिफिशल व्हायरस असून आता जगभरात त्याच्या विरोधात लढण्यासाठी औषधाचा शोध घेतला जात आहे. आतापर्यंत कोणतेच औषध कोरोनाच्या व्हायरसवर उपलब्ध नाही आहे. परंतु लवकरात लवकर यावर औषध येईल अशी आशा नितिन गडकरी यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे कोरोनापासून आपली सुटका होईल. नितिन गडकरी यांनी ही प्रतिक्रिया अमेरिका वारंवार चीनवर कोरोना व्हायरस बनवण्याचा आरोप लावत असल्याने दिली आहे.(देशातील अडकलेल्या लोकांसाठी Air India 19 मे ते 2 जून या कालावधीमध्ये चालवणार Domestic Flights; जाणून घ्या कोणत्या शहरासाठी किती विमाने)

दरम्यान, जगभरात कोरोनाचे संक्रमण 44 लाख जणांना झाले आहे. तर 3 लाख जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. काही देशांनी त्यांच्या येथे लॉकडाउनचे नियम शिथील करण्यात येत आहे. इटलीत फ्रान्स सारख्या देशात सुद्धा लॉकडाउचे नियम शिथील करण्यात येत असून हळूहळू काही गोष्टी सुरु करण्यात येत आहेत. तर भारतात कोरोनाबाधितांचा आकडा 78003 वर पोहचला असून 2549 जणांचा बळी गेला आहे. त्याचसोबत 49219 जणांवर उपचार सुरु असू 26235 जणांची प्रकृती सुधारली आहे.