Chhattisgarh Assembly Elections 2018 Exit Poll Results | (Photo courtesy: Archived, edited and representative images)

Chhattisgarh Assembly Elections 2018 Exit Poll Results: मध्य प्रदेश (Madhya Pradesh), राजस्थान ( Rajasthan), छत्तीसगढ (Chhattisgarh), तेलंगणा (Telangana) आणि मिझोराम (Mizoram)या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी सुरु असलेले मतदान आज (शुक्रवार, ७ डिसेंबर) पूर्ण झाले. मध्य प्रदेश, छत्तीसगढ, आणि मिझोराम या राज्यांसाठी मतदान आगोदरच पूर्ण झाले होते. तर, राजस्थान आणि तेलंगणासाठी मतदान आज पार पडले. पाचही राज्यातील मतदानानंतर 11 डिसेंबरला मतमोजणी पार पडणार आहे. दरम्यान, तोपर्यंत सर्वांना उत्सुकता लागली आहे ती एक्झिट पोलचे आकडे काय सांगतात याकडे. त्यामुळे विविध वृत्तवाहिण्या, संस्थांनी केलेल्या सर्व्हेक्षणतातील निकालाबाबतचे अंदाज जाहीर झाले आहेत. या संस्थांचे एक्झिट पोल काय सांगत आहेत? हे विस्ताराने जाणून घ्या...

NEWS 24 च्या सर्वेनुसार काँग्रेसच्या हाती अधिक जागा येऊ शकतात.

कांग्रेसला 45-51 सीट मिळण्याचा अंदाज

भाजपला 36-42 सीट मिळण्याचा अंदाज

अन्य उमेदवारांना  4 - 8 सीट्स मिळू शकतात, यामध्ये मायावतीच्या  बीएसपी पक्षाचा देखील समावेश आहे. (हेही वाचा : मिझोराममध्ये कोण घेणार आघाडी? काय म्हणतोय एक्झिट पोल?)

Times Now- CNX च्या सर्वेनुसार भाजपला 46 सीट्स तर कांग्रेसला 35 सीट्स मिळण्याचा अंदाज आहे.

India News च्या सर्वेनुसार स्पर्धा अटीतटीची आहे मात्र भाजप बाजी मारू शकतं

BJP- 43

Congress- 40

अन्य- 7

न्यूज नेशनच्या सर्वेनुसार भाजपला पराभवाचा सामना करावा लागू शकतो. भाजपला 38-42, काँग्रेसला 40-44 सीट्स मिळू शकतील.

आजतकच्या सर्व्हेनुसार काँग्रेससाठी आनंदाची बातमी आहे. काँग्रेसला 55-65 सीट्स मिळण्याचा अंदाज आहे. भाजपाला 21-31, अन्य 4-8 जागेवर निवडून येऊ शकतो.

सी-वोटर च्या अनुसार, भाजपा  35-43, काँग्रेस  40-50, बीएसपी+जेसीसी 3-7 जागांवर विजयी होऊ शकते

India TV च्या सर्वेनुसार चौथ्यांदा भाजपचे सरकार येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

BJP: 42-50

Congress: 32-38

छत्तीसगडमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदानामध्ये 76.39 % मतदान झाले होते. दुसऱ्या टप्प्यातील मतदानामध्ये 76.34 % मतदान झाले. हे मतदान 72 जागांसाठी झाले. राज्यातील 90  सदस्यीय विधानसभेसाठी 38 जागांवर 80 % हून अधिक मतदान झाले आहे. कुरुद विधानसभा जागेवर सर्वाधिक 88.99 % मतदान झाले आहे. तर सर्वात कमी मतदान रायपूर उत्तर या जागेवर 60.03 % झाले आहे. मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदा 1.05% मतदान कमी झाले आहे.