केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मध्यप्रदेश (Madhya Pradesh), छत्तीसगड (Chhattisgarh), राजस्थान (Rajasthan), मिझोरम (Mizoram) आणि तेलंगणाची (Telangana) पाच राज्यातील विधानसभा निवडणूका जाहीर केल्या आहेत. छत्तीसगडमध्ये ७ नोव्हेंबर आणि १७ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. 17 नोव्हेंबर रोजी मध्य प्रदेश; 7 नोव्हेंबरला मिझोराम, 23 नोव्हेंबरला राजस्थान आणि 30 नोव्हेंबरला तेलंगणाआणि 3 डिसेंबर दिवशी मतमोजणी केली जाईल अशी माहिती निवडणूक आयोगाने केली आहे. देशाच्या 2024 च्या लोकसभा निवडणूकीच्या आधी होणार्या या विधानसभा निवडणूका कॉंग्रेस, भाजप सह प्रादेशिक पक्षांसाठी महत्त्वाच्या असणार आहे. लोकसभेच्या आधी लिटमस चाचणी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं आहे.
मध्य प्रदेशात विधानसभेच्या 230 जागा आहेत. राजस्थान मध्ये 200 जागा आहेत तर मणिपूर मध्ये 40, छत्तीसगड मध्ये 90 आणि तेलंगणा मध्ये 119 जागांवर विधानसभा निवडणूकांची धुमश्चक्री रंगणार आहे. सध्या राजस्थान आणि छत्तीसगड या दोन राज्यांमध्ये काँग्रेसची सत्ता आहे, तर मध्य प्रदेशात भाजपची सत्ता आहे. केसीआरच्या नेतृत्वाखालील भारत राष्ट्र समिती तेलंगणात सत्तेवर आहे आणि मिझो नॅशनल फ्रंट (एमएनएफ) मिझोराममध्ये सत्तेत आहे.
मिझोराम विधानसभा निवडणूक वेळापत्रक
SCHEDULE OF #Mizoram Legislative Assembly Election . Details 👇#ECI #AssemblyElections2023 #MCC #ElectionSchedule pic.twitter.com/pyzjSyypop
— Election Commission of India #SVEEP (@ECISVEEP) October 9, 2023
राजस्थान विधानसभा निवडणूक वेळापत्रक
SCHEDULE OF #Rajasthan Legislative Assembly Election . Details 👇#ECI #AssemblyElections2023 #MCC #ElectionSchedule pic.twitter.com/aO4UKg5Ufa
— Election Commission of India #SVEEP (@ECISVEEP) October 9, 2023
तेलंगणा विधानसभा निवडणूक वेळापत्रक
SCHEDULE OF #Telangana Legislative Assembly Election . Details 👇#ECI #AssemblyElections2023 #MCC #ElectionSchedule pic.twitter.com/iVdDXfcKr5
— Election Commission of India #SVEEP (@ECISVEEP) October 9, 2023
मध्यप्रदेश निवडणूक वेळापत्रक
SCHEDULE OF #MadhyaPradesh Legislative Assembly Election . Details 👇#ECI #AssemblyElections2023 #MCC #ElectionSchedule pic.twitter.com/u1Xnl4S8Nv
— Election Commission of India #SVEEP (@ECISVEEP) October 9, 2023
छत्तीसगड निवडणूक वेळापत्रक
SCHEDULE OF #Chhattishgarh Legislative Assembly Election . Details 👇#ECI #AssemblyElections2023 #MCC #ElectionSchedule pic.twitter.com/GhDoBGcWmO
— Election Commission of India #SVEEP (@ECISVEEP) October 9, 2023
मध्य प्रदेशात निवडणूकांची तारीख जाहीर होण्यापूर्वीच भाजपा कडून केंद्रीय मंत्री निवडणूकीत उतरवण्यास तयारी झाली आहे. गुजरात प्रमाणेच एमपी मध्येही सारे मंत्रिमंडळ दूर ठेवत नव्या चेहर्यांना भाजपा कडून संधी दिली जाण्याची शक्यता आहे. एमपीचे विद्यमान मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचं नाव जाहीर तिकीट वाटपात अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही.