Kiran Mane | (Photo Credits: Facebook)

Kiran Mane: महाराष्ट्रात लोकसभा निमडणुकीचा (Lok Sabha Election 2024) निकाल जाहीर झाला. राज्यात भाजप नेत्यांना त्यांच्या अपेक्षेप्रमाणे आकडा ओलांडता आला नाही. लोकसभा निवडणुक तोंडावर असताना भाजप नेत्यांनी मोठमोठ्या घोषणा केल्या होत्या. त्याचे व्हिडीओ शेअर करत काहीजण भाजप नेत्यांना डिवचण्याचा प्रयत्न करत आहेत. अभिनेता किरण माने यांनी आशिष शेलार यांचा एक जुना व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात आशिष शेलार हे महाविकास आघाडीला 18 जागा निवडून आल्या तर मी राजकारणातून निवृत्ती घेईन असं म्हणताना दिसत आहेत. महत्त्वाचं म्हणजे, या व्हिडीओत आशिष शेलार यांनी केलेलं चॅलेंज आता महाविकास आघाडीने पर्ण केलं आहे. त्यामुळे आता आशिष शेलार राजकारण सोडणार का? असा सवाल उपस्थित झाला आहे. (हेही वाचा:Devendra Fadnavis: मला पदमुक्त करा! देवेंद्र फडणवीस यांची मागणी, लोकसभा पराभवाची जबाबदारीही स्वीकारली )

लोकसभा निवडणुक 2024मध्ये भाजपला राज्यासह दिल्लीत देखील चांगलाच धक्का बसला आहेत. त्याचे अनेक दिग्गज नेते यांना पराभव पत्कारावा लागला आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक जागा काँग्रेसला 13, शरदचंद्र पवार गटाला 8, ठाकरे गटाला 9, जागा जिंकल्या आहेत. महाविकास आघाडीला 30 आणि महायुतीला 17 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी यंदाच्या लोकसभेचा गुलाल उधाळला. (हेही वाचा:Bajrang Sonawane Accident: बीडचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणें यांच्या कारचा भीषण अपघात, जखमींवर उपचार सुरू )

किरण माने यांची पोस्ट

आशिष शेलारांच्या प्रतिआव्हाना प्रमाणे जर महाविकास आघाडीला 18 जागा मिळाल्या असत्या तर आशिष शेलार राजकारण सोडणार होते. पण आता महाविकास आघाडीला 30 जागा मिळाल्या. त्यामुळे किरण माने यांनी त्यांचा हा व्हिडिओ शेअर करत म्हटलं की, 'खरा मर्द दिलेला शब्द पाळतो. आशिषजी तुम्ही तो पाळणार याची खात्री आहे.'

आशिष शेलारांनी काय म्हटलं?

उद्धव ठाकरे यांना माझं जाहीर आवाहन आहे, जर लोकसभेत भारतीय जनता पक्षाने 45 च्या वर जागा मिळवल्या तर तुम्ही राजकारण सोडाल आणि मी तुम्हाला प्रतिआव्हान देतो की, देशात जाऊद्या, महाराष्ट्रात तुम्ही गेल्यावेळी आमच्यासोबत होतात म्हणून 18 होतात आता तुम्ही महाविकास आघाडी म्हणून जरी 18 आला तरी मी राजकारण सोडून देईन.