Bajrang Sonawane Accident: बीडचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणें यांच्या कारचा भीषण अपघात, जखमींवर उपचार सुरू

बीडचे शरद पवार गटाचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणे यांच्या कारचा भीषण अपघात झाला आहे. सुदैवाने या अपघातात त्यांना काही ईजा झाली नाही. मात्र, काहीजण जखमी झाले आहेत. जखमींवर उपचार सुरू आहेत.

Bajrang Sonawane Accident: बीडचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणें यांच्या कारचा भीषण अपघात, जखमींवर उपचार सुरू
Photo Credit- x

Bajrang Sonawane Accident: बीडचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणे यांच्या कारचा भीषण अपघात (Beed MP Bajrang Sonawane Accident) झाला आहे. रात्री उशीरा ते मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी गेले होते. जरांगे पाटील यांची भेट घेऊन परतत असताना हा अपघात झाला. जालना जिल्ह्यात धुळे - सोलापूर महामार्गावर रात्री उशिरा हा अपघात झाला. अपघातात बजरंग सोनवणे यांच्या ताफ्यातील एक गाडी बजरंग सोनवणे यांच्या गाडीला धडकली. या अपघातामध्ये काहीजण जखमी झाले आहेत. जखमींवर उपचार सुरू आहे. बजरंग सोनवणे यांच्यासह इतर सर्वजण सुखरूप असल्याची माहिती समोर आली आहे. (हेही वाचा:INDIA Bloc Meeting: सत्ता स्थापनेसाठी दावा? इंडिया आघाडी सक्रीय; दिल्लीमध्ये खलबतं, शरद पवार, सुप्रिया सुळे राजधानीकडे रवाना )

दरम्यान हा अपघात इतका भीषण होता की, या अपघातामध्ये बजरंग सोनवणे यांच्या गाडीचं मोठं नुकसान झालं आहे. त्याचा गाडीचा काही भाग चेपला गेला आहे. जरांगे पाटील यांची भेट घेऊन परतत असताना हा अपघात झाला आहे.

(The above story first appeared on LatestLY on Jun 05, 2024 12:49 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).