पीएम मोदी और अरुण जेटली (File Photo)

भाजप पक्षाचे वरिष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री अरुण जेटली (Arun Jaitley) यांचे आज दुपारी दिल्लीमधील AIIMS रुग्णालयात निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून जेटली यांच्यावर एम्स रुग्णालयात उपचार सुरु होते. उद्या दुपारी निगमबोध घाट येथे जेटली यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहे. मात्र जेटली यांच्या अंतिम संस्कारावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी  (Narendra Modi) उपस्थित राहणार नाही आहेत. त्यामुळे मोदी यांच्या वतीने राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी दिवंगत अरुण जेटली यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

तीन देशांच्या दौऱ्यावर गेलेल्या मोदी यांना जेटली यांच्या निधनाची बातमी कळली. त्यावेळी जेटली यांच्या परिवारासोबत नरेंद्र मोदी यांनी संपर्क साधला. दरम्यान मोदी यांनी त्यांचा विदेशी दौरा रद्द करु नये असे अपील जेटली यांच्या परिवाराने केले.(Arun Jaitley यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केला शोक; जेटली कुटुंबियांकडून मोदींना परदेश दौरा रद्द न करण्याचे आवाहन)

मोदी यांनी फ्रान्स, युएई आणि आता बेहरीन येथे विदेशी दौऱ्यासाठी गेले आहेत. तर सोमवारी फ्रान्स मधील जी-7 शिखर सम्मेलनात सहभागी झाल्यानंतर मोदी पुन्हा भारतात परतणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आता मोदी बेहरीन येथे आहेत. त्यामुळेच मोदी अरुण जेटली यांच्या अंतिम संस्कारासाठी उपस्थित राहणार नसल्याचे बोलले जात आहे.