Arun Jaitley यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केला शोक; जेटली कुटुंबियांकडून मोदींना परदेश दौरा रद्द न करण्याचे आवाहन
Narendra Modi and Arun Jaitley (Photo Credits: PTI)

Arun Jaitley Demise: भाजपा नेते आणि माजी अर्थमंत्री अरूण जेटली (Arun Jaitley) यांची 9 ऑगस्ट पासून सुरू असलेली मृत्यू सोबतची झुंज आज (24 ऑगस्ट) अखेर अयश्स्वी ठरली आहे. एम्समध्ये अरूण जेटली यांनी 12 च्या सुमारास अखेरचा श्वास घेतला. अरूण जेटलींच्या निधनाचे वृत्त समजताच कॉंग्रेस पक्षासह, भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांसह राजकारणापलिकडील अनेक मान्यवरांनी हळहळ व्यक्त केली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनीदेखील ट्विटरच्या माध्यमातून शोक व्यक्त केला आहे. सध्या नरेंद्र मोदी अबुधाबी मध्ये आहेत. जेटली परिवाराशी नरेंद्र मोदी यांची फोनवरून बातचीत झाली असून जेटलींच्या पत्नी आणि मुलाने त्यांना परदेश दौरा रद्द करून येऊ नका असं आवाहन केल्याचे वृत्त आहे. त्यांनी दौरा पूर्ण करून भारतामध्ये परतावं असेही सांगण्यात आले आहे.  अमित शहा, सुरेश प्रभू सह भाजप, कॉंग्रेस नेत्यांकडून अरूण जेटली यांना श्रद्धांजली

नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून श्रद्धांजली देताना अरूण जेटली यांचं भारताच्या विकासामध्ये बहुमुल्य योगदान आहे. त्यांच्या निधनाचं वृत्त मन खिन्न करणारं आहे असे ट्वीट केले आहे.भाजपा आणि अरूण जेटलींचं बंध अतुट आहे. त्यांच्या रूपाने जवळचा साथीदार, मित्र गमवल्याची भावना मोदींनी व्यक्त केली आहे.  तसेच जेटली यांची पत्नी सविता आणि मुलासोबत बोलणं झाल्याचं ट्वीटदेखील त्यांनी केलं आहे. अरुण जेटली यांचे व्यक्तिगत जीवन, शिक्षण आणि राजकीय कारकीर्द पहा काय होती?

पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्वीट 

आज अबुधाबी मध्ये नरेंद्र मोदी यांचा 'ऑर्डर ऑफ़ ज़ायेद' या युएई मधील सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरव होणार आहे. हा पुरस्कार मिळवणारे मोदी हे पहिले भारतीय नेते होते. मात्र आता मोदी काय निर्णय घेणार याबाबत खुलासा करण्यात आलेला नाही.