Arun Jaitley (Photo Credits: IANS/File)

भाजपा नेते आणि माजी भारतीय अर्थमंत्री अरूण जेटली(Arun Jaitley) यांचे आज (24 ऑगस्ट) निधन झाले आहे. दिल्ली येथील एम्स (AIIMS) रूग्णालयात 9 ऑगस्टपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र आज अखेर त्यांचा मृत्यूसोबत सुरू असलेला संघर्ष संपला आहे. दुपारी 12 वाजून 7 मिनिटांनी त्यांनी वयाच्या 66 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. अरूण जेटली यांच्या निधनाने भारतीय जनता पक्षातील मोठं व्यक्तिमत्त्व हरपलं आहे. काही दिवसांपूर्वीच सुषमा स्वराज यांचं निधन झालं आहे. अरुण जेटली यांचे निधन, दिल्ली येथील AIIMS रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास. 

महाराष्ट्रातही शिवसेना - भाजपा युती मजबूत ठेवण्यासाठी अरूण जेटली यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. भाजपा पक्षापलिकडे जाऊन त्यांनी अनेकदा विरोधी पक्षांच्या नेत्यांसोबतही चांगले संबंध होते. त्यामुळे आज त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच सार्‍याच स्तरातून हळहळ व्यक्त केली आहे. अरुण जेटली यांचे व्यक्तिगत जीवन, शिक्षण आणि राजकीय कारकीर्द पहा काय होती?

कॉंग्रेस पक्ष

अमित शहा

सुप्रिया सुळे

सुरेश प्रभू

 

भाजपा महाराष्ट्र

 

अरुण जेटली हे मधुमेहानेही त्रस्त होते. त्यांच्यावर किडणी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वीच त्यांना सॉफ्ट टिशू कॅन्सर झाल्याचेही निदान झाले होते. त्यांनी लठ्ठपणापासून स्वत:ची सुटका करुन घेण्यासाठी बैरिएट्रिक सर्जरीही केली होती. मागील काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक बनली होती.