ABP- C Voter Bihar Elections Exit Polls: यंदा कोरोना संकटाच्या सावटाखाली बिहार विधानसभा निवडणूक 2020 (Bihar Elections) पार पडली आहे. दरम्यान 10 नोव्हेंबरला 243 जागांसाठी झालेल्या या निवडणूकीचा निकाल हाती येणार असला तरीही आता एक्झिट पोलच्या (Exit Polls) अंदाजाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विविध संस्था निवडणूकीच्या मतदानानंतर मतदारांनी नेमकं कोणाला मत दिलं आहे याचं सर्वेक्षण करून एक अंदाज बांधला जातो. यंदा सी व्होटर (C Voters) सोबत एबीपी न्यूज एकत्र एक्झिट पोल करत आहे. दरम्यान आता त्याचे अंदाज हळूहळू समोर येण्यास सुरूवात झाली आहे. बिहार मध्ये यंदा महागठाबंधन विरूद्ध एनडीए असा सामना रंगणार आहे. यासोबतच अनेक लहान स्थानिक पक्ष देखील आपली ताकद आजमवत आहेत.
नितिश कुमार हे बिहारचे यापूर्वीचे मुख्यमंत्री होते. जनता दल आणि भाजपाचं सरकार सत्तेमध्ये होते. मात्र त्यांच्या विरूद्ध आता तरूण पिढीतून चिराग पासवान, तेजस्वी यादव यांनी आव्हान देत बिहार निवडणूकीमधील लढत अधिक रंगतदार केली आहे. मात्र बिहारची जनता कुणाच्या पारड्यात मत टाकणार याबाबत राजकीय पक्षांसोबतच उमेदवार आणि जनतेच्या मनातही उत्सुकता आहे.
एबीपी आणि सी व्होटर एक्झिट पोल निकाल
2015 साली बिहारच्या विधानसभेमध्ये आरजेडी सर्वाधिक 80 जागांवर विजयी झाली होती. त्यांच्यापाठोपाठ नीतीश कुमार यांची जेडीयू होती त्यांच्याकडे 71 जागा होत्या. भाजपा कडे 54, कॉंग्रेस कडे 27,एलजेपी कडे 2, आरएलएसपी कडे 2, हम कडे 1 आणि अन्य 7 असे पक्षीय बलाबल होते.