कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे पीएम नरेंद्र मोदी यांनी केली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बातचीत
Prime Minister Narendra Modi, Chief Minister Uddhav Thackeray | (Photo Credits-ANI)

देशात कोरोनाच्या प्रादुर्भाव दिवसागणिक वेगाने वाढत चालला आहे. प्रत्येक दिवशी लाखोंच्या संख्ये रुग्ण आढळून येत आहेत. कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे गेल्या तीन दिवसांपासून चार लाखांहून नव्या रुग्णांची नोंद केली जात आहे. अशातच महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांचा आकडा सर्वाधिक असल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्रात गेल्या एक-दोन दिवसात कोरोनाचे नवे 54,022 रुग्ण आढळून आले आहेत. राज्यातील कोरोनाची बिघडलेली परिस्थिती पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बातचीत केली. त्याचसोबत राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतला.(COVID-19 च्या राष्ट्रीय नीतीमध्ये बदल, आता आरोग्य केंद्रात भरती होण्यासाठी पॉजिटीव्ह रिपोर्ट असणे बंधनकारक नाही, जाणून घ्या नवी नियमावली)

देशात कोरोनाचे अधिक रुग्ण हे महाराष्ट्रातील आहेत. शुक्रवारी महाराष्ट्रात कोरोनाचे 54 हजारांहून अधिक रुग्ण आढळल्याने आकडा 49,96,758 वर पोहचला आहे. आरोग्य विभागाच्या मते, संक्रमणामुळे 898 जणांचा बळी गेला आहे. राज्यात आतापर्यंत 74,413 जणांचा मृत्यू झाला आहे. विविध रुग्णालयत 37,386 आणि रुग्णांना डिस्चार्ज दिल्यानंतर एकूण 42,65,326 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर मुंबईत कोरोनाचे नवे 3040 रुग्ण आढळले असून 71 जणांचा मृत्यू झाला आहे. पुणे, नाशिक, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात चार शहरांच्या तुलनेत ग्रामीण विभागात संक्रमणाचे अधिक रुग्ण समोर येत आहेत.(कोविड-19 लसीसंदर्भातील गोंधळ टाळण्यासाठी CoWIN App वर security code चे नवे फिचर; पहा काय आहे खासियत)

दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देशात कोरोनाचे नवे 4,01,078 रुग्ण आढळले असून गेल्या 24 तासात 4187 जणांचा बळी गेला आहे. तसेच 3,18,609 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. देशात कोरोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा आता 37 लाखांच्या पार गेला आहे.तर दिवसागणित वाढणारी रुग्णसंख्या आणि मृतांचा आकडा नक्कीच चिंताजनक आहे. या कठीण काळात जनतेच्या मदतीसाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. राहुल गांधी यांनी आज कोविड-19 रुग्णांसाठी मेडिकल अॅडव्हायजरी हेल्पलाईन  लॉन्च केली आहे. त्याचबरोबर त्यांनी देशातील डॉक्टरांनी या लढाईत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे