भारतात कोविड-19 लसीकरणाला (Covid-19 Vaccination) सुरुवात झाली असून त्यासाठी सरकारने कोविन अॅप (CoWIN App) सादर केले आहे. मात्र यातील लूपहोल्स (Loopholes) अनेक युजर्सच्या सोशल मीडिया पोस्टमुळे उघड झाले आहेत. लस न मिळालेल्यांना देखील कोविन अॅपकडून लस मिळाल्याचा मेसेज जात होता. त्यानंतर सरकारने हा गोंधळ टाळण्यासाठी आणि आता ऑनलाईन नोंदणी केलेल्यांनाच ही लस मिळेल याची खात्री करण्यासाठी 4 अंकी सुरक्षा कोड (4-digit security code) आणला आहे. जाणून घेऊया हे नवे फिचर कसे काम करेल...
नागरिकांनी कोविन पोर्टलवर कोविड लसीकरणासाठी अपॉयमेंट बुक केली होती. परंतु प्रत्यक्षात निर्धारित तारखेला लसीकरणासाठी गेले नव्हते. अशांना देखील एक डोस प्राप्त झाल्याचा एसएमएस पाठवण्यात आला होता. याबद्दल तपासणी केल्यावर व्हॅसिनेटरकडून चुकीच्या पद्धतीने नागरिकांना लस मिळाल्याचे मार्क करण्यात येत होते, असे स्पष्टीकरण आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने आपल्या निवेदनात दिले आहे. त्यामुळे ही गफलत टाळण्यासाठी सरकारने 4 डिजिट सिक्युरीटी कोड सादर केला आहे. 8 मे 2021 पासून 4 digit security code कोविन अॅपमध्ये लागू होईल. लसीकरणाच्या स्लॉटसाठी ऑनलाईन बुकिंग केलेल्या नागरिकांनासाठीच हे नवे फिचर लागू होईल.
लस घेण्यापूर्वी verifier/vaccinator तुम्हाला 4 डिजिट कोड विचारेल आणि त्यानंतर लसीकरणाचे स्टेटस नीट रेकॉर्ड होण्यासाठी तो कोड कोविन अॅपमध्ये अॅड केला जाईल. हा 4 अंकी नंबर तुमच्या नियुक्ती पावतीमध्ये छापला जाईल. हा कोड केवळ तुमहाला ठाऊक असेल. लसीची अपॉयमेंट बुक झाली हे दाखवण्यासाठी हा कोड SMS द्वारे पाठण्यात येईल. अपॉईंटमेंट अलॉटमेंट स्लिप तुम्ही मोबाईलवर देखील सेव्ह करु शकता. (COVID-19 Vaccination For 18-44 Age Group in India: भारतात 18 ते 44 वयोगटातील व्यक्तींनी CoWin Portal वर आपल्या पहिल्या कोरोना लसीकरणाची नोंदणी कशी करावी?)
या डिजिटल कोडमुळे एखाद्या नागरिकाच्या लसीकरणाच्या स्थितीसंबंधी डेटाची योग्यरित्या नोंद केली जाईल. तसंच लसीकरण व्याप्ती सुलभ करण्यासाठी कोविनमध्ये प्रदान केलेल्या सुविधेचा गैरवापर टाळता येईल. मात्र लसीकरणासाठी जाताना तुमच्याकडे appointment slip किंवा appointment confirmation SMS आलेला मोबाईल असणे अत्यंत गरजेचे आहे.
लस देणाऱ्याला सिक्युरीटी कोड देणे गरजेचे आहे कारण त्यानंतरच लसीचे डिजिटल सर्टिफिकेट जनरेट होईल. या संपूर्ण प्रक्रीयेनंतर तुम्हाला confirmation SMS येईल. हा एसएमएस सूचित करते की लसीकरण प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे आणि डिजिटल प्रमाणपत्र जनरेट झाले आहे. जर तुम्हाला लसीसाठी confirmation SMS न आल्यास लसीकरण केंद्राच्या इन-चार्जशी संपर्क साधा.