कोविड-19 रुग्णांसाठी Rahul Gandhi यांनी लॉन्च केली 'Hello Doctor' हेल्पलाईन
Rahul Gandhi (Photo Credits: PTI)

देशात सध्या कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेचे (Coronavirus Second Wave) थैमान सुरु आहे. दिवसागणित वाढणारी रुग्णसंख्या आणि मृतांचा आकडा नक्कीच चिंताजनक आहे. या कठीण काळात जनतेच्या मदतीसाठी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. राहुल गांधी यांनी आज कोविड-19 रुग्णांसाठी मेडिकल अॅडव्हायजरी हेल्पलाईन (Medical Advisory Helpline) लॉन्च केली आहे. त्याचबरोबर त्यांनी देशातील डॉक्टरांनी या लढाईत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. यासंबंधितची माहिती राहुल गांधी यांनी ट्विटच्या माध्यमातून शेअर केली आहे.

राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले, "भारताने एकत्र येऊन आपल्या लोकांना मदत करणे गरजेचे आहे. आम्ही हॅलो डॉक्टार मेडिकल अॅव्हायजरी हेल्पलाईन लॉन्च केली आहे. वैद्यकीय सल्ल्यासाठी +919983836838 या क्रमांकावर संपर्क करा." त्याचबरोबर त्यांनी डॉक्टर्स आणि आरोग्य सेवकांना तुमच्या मदतीची गरज असल्याने यात सहभागी व्हा, असे आवाहन केले आहे.

Rahul Gandhi Tweet: 

सर्व डॉक्टारांनी विनंती आहे की, त्यांच्या अनुभवाचा फायदा देशभरातील सर्व कोविड रुग्णांना करुन देण्यासाठी पुढे या. सध्याच्या आरोग्य संकटात प्रत्येकाला करुणा, पाठिंबा आणि आशा यांची गरज आहे. त्यामुळे तुम्ही जर डॉक्टर असाल तर हॅलो डॉक्टरवर स्वत: ला रजिस्टर करा आणि कोरोना रुग्णांची मदत करा. कोविड लढाई सेवा देऊ इच्छिणारे डॉक्टरांना प्लॅटफॉर्मवर त्यांचे राज्य, उपलब्धतेचा कालावधी आणि दिवस याची माहिती भरायची आहे. (Rahul Gandhi on Central Government: PR, अनावश्यक गोष्टींवर खर्च करण्याऐवजी Corona Vaccine, ऑक्सीजन पुरवठ्याकडे लक्ष द्या; राहुल गांधी यांचा केंद्र सरकारला सल्ला)

दरम्यान, आज देशात 4 लाखांहून अधिक कोरोना रुग्ण आढळून आले असून 3523 जणांचा मृत्यू झाला आहे. 2,99,988 जणांनी कोरोनावर मात केली असून 32,68,710 सक्रीय रुग्ण आहेत.